साहित्य:
७ ते ८ अळूची मध्यम आकाराची पाने
३ ते ४ टेबलस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेबलस्पून चणाडाळ
२ टेस्पून तेल
२ चिमटी मोहरी
१/८ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून लाल तिखट
८ ते १० कडीलिंबाची पाने
१ मोठा चमचा डाळीचे पीठ (बेसन)
१ टीस्पून चिंच
२ टीस्पून गोडा मसाला
२ टीस्पून गूळ
चवीपुरते मीठ
कृती:
सर्वप्रथम शेंगदाणे आणि चणा डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घाला. नंतर प्रशर कुकरमध्ये १ किंवा २ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. १/२ कप पाण्यात चिंच १० मिनिटे भिजवत ठेवा. नंतर चिंच कुस्करुन कोळ काढून घ्या. अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्याचे देठ वेगळे करा. आणि सोलून घ्या. नंतर पाने तसेच देठही चिरुन घ्या.
कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळद, तिखट, कडुलिंब घालून फोडणी करुन घ्या. यात चिरलेली अळूची पाने आणि देठ घाला. त्यातच १/२ टीस्पून मीठ घाला. झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे शिजवा. अळू जर कोरडा वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडा. त्यात चिंचेचा कोळ घाला. व पुन्हा ३-४ मिनिटे शिजवा. १/२ कप पाण्यात १ मोठा चमचा बेसन गुठळी न होता मिक्स करुन घ्या. हे मिश्रण कढईत घालून ढवळा. यात शिजवलेली चणाडाळ आणि शेंगदाणे घाला. गरजेनुसार थोडं पाणी घाला. बेसन शिजेस्तोवर उकळी काढा. अशाप्रकारे गरमागरम अळूची भाजी तयार. भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
— सौ.सुनिता मुकुंद वढावकर
Leave a Reply