नवीन लेखन...

अवयवदानाचा संकल्प

शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…

गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.

मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.

देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.

मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.

अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.

आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्‍याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे  बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.

श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

 

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..