नवीन लेखन...

अवरक्त आणि जंबुपार



एखाद्या पदार्थाकडून जेव्हा त्याच्यावर पडणार्‍या प्रकाशकिरणांच्या ऊर्जेचं शोषण होतं तेव्हा त्याला मिळालेली वाढीव ऊर्जा नेहमीच उष्णतेच्या रुपात प्रकट होते असं नाही.
ती निरनिराळी रुपं धारण करू शकते. प्रसंगी त्यातली काही ऊर्जा, किंवा संपूर्ण देखील, परत उत्सर्जित होऊ शकते. जर त्या वाढीव ऊर्जेचा काही अंशच परत उत्सर्जित झाला

तर अर्थात ती ऊर्जा धारण करणार्‍या प्रारणाच्या लहरींची तरंगलांबी मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा जास्ती असते. कारण ऊर्जेची मात्रा आणि तरंगलांबी यांचं नातं व्यस्त असतं. जेवढी ऊर्जेची मात्रा अधिक तेवढी तरंगलांबी कमी आणि ऊर्जेची मात्रा जास्ती तेवढी तरंगलांबी कमी. म्हणून तर तांबड्या रंगाचा किंवा त्याहीपलीकडे असलेला अवरक्त प्रकाश चांगली उब देऊ शकतो. मुक्या मारावर उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. तो सहसा हानीकारक असत नाही. पण त्या तांबड्या रंगाच्या प्रकाशापेक्षा कमी तरंगलांबी असणारा निळा किंवा त्याहीपलीकडचा जंबुपार प्रकाश मात्र धोकादायक असतो. आपल्या डोक्यावरचं ओझोनचं छत्र म्हणूनच तर मूल्यवान आहे. कारण ते सूर्यप्रकाशातल्या या जंबुपार किरणांना रोखून धरतं आणि त्याच्या हानीकारण परिणामांपासून आपल्यााला वाचवतं. तर असं हे उर्जेची मात्रा आणि तरंगलांबी यांचं एकमेकांशी असलेलं नातं व्यस्त असल्यामुळे जेव्हा एखाद्या पदार्थाकडून शोषल्या गेलेल्या ऊर्जेपैकी काही अंशच परत उत्सर्जित होतो तेव्हा साहजिकच ती धारण करणार्‍या लहरींची तरंगलांबी जास्ती भरते. द्रुतगती मार्गावरच्या काही पाट्या वेगळ्या रंगाच्या असतात.
तिथं काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या अंगावर एक रंगीत जाकीट असतं. या पाट्यांवर प्रकाश पडला तर त्यावरच्या रंगीत अक्षरांकडून तो शोषला जातो आणि अधिक झळाळी लेवून परत उत्सर्जित केला जातो. त्यामुळे त्या पाट्यांवरचा संदेश सहज ध्यानात येतो. तसंच ते कर्मचारी तिथं काम करत असल्याचं अंधारातही दिसून येतं.
काही घड्याळांवरचे काटेही असेच दिवसा शोषलेला प्रकाश रात्रीच्या अंधारात मंद हिरव्या रंगात उत्सर्जित करत असतात.
उलटपक्षी सौरचुलीमध्ये किंवा

छपरावर लावलेल्या सौरपट्टीमध्ये या शोषण केलेल्या सूर्यप्रकाशातल्या ऊर्जेचा वापर पाणी तापवण्यासाठी आणि त्यायोगेच अन्न शिजवण्यासाठी करता येतो.

<चित्रसंदर्भः

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..