आपण राहतो ती भौतिक सृष्टी म्हणजे अध्यात्मिक विश्वातील गोलोकधामाची प्रतिकृती असून या सृष्टीला अव्यक्त वटवृक्षाची उपमा वैदिक धर्मग्रंथांमध्ये देण्यात आली आहे. इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या मतानुसार ज्या अर्थी ही सृष्टी प्रतिबिंब आहे, त्या अर्थी अध्यामिक विश्वातील गोलोकधामाचे खरेखुरे अस्तित्व
असायलाच हवे. आपण नदीच्या पाण्यात कडेला असलेल्या झाडांची उलटी प्रतिमा नेहमी पाहतो. तशीच प्रतिकृती या विश्वाची असून त्याला वैदिक धर्मग्रंथांत अव्यक्त उलट्या वटवृक्षाची उपमा देण्यात आली आहे.या वटवृक्षाच्या सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या फांद्या आहेत. अंतराळातील विविध ग्रहमालिका या वटवृक्षाच्या शाखा आहेत. जीवाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या वृक्षाची फळे आहेत. जसे प्रतिबिंब असते, तसे मूळ शाश्वत प्रतिमा असते. प्रतिबिंब कधी दिसते, कधी दिसत नाही. त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. खालच्या बाजूला मनुष्य, घोडे, गायी, कुत्रे तर वरच्या बाजूला देवता, गंधर्व आदी उच्च जीव आहेत. भौतिक सृष्टीच्या सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या प्रभावामुळे मनुष्य चांगली, वाईट कृत्ये करून सुख-दुःख भोगत असतो. प्रभुपाद यांच्या मते या त्रिगुणांच्या अतीत असणारा आणि सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांना शरण गेलेला भक्त पुन्हा या भौतिक सृष्टीत परतून येत नाही. नास्तिक, निर्विशेष आणि शून्यवादी लोकांच्या मते मनुष्यचा मृत्यू झाल्यानंतर तो ईश्वरात विलीन होतो. मात्र सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांनीच श्रीमद्भगवतगीतेत स्पष्ट केले आहे, की मृत्युनंतरदेखील जीवाचे अस्तित्व कायमस्वरूपात असते. एकंदरीत, तथाकथित धर्मप्रस
ारकांनी अध्यात्माविषयी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सामान्य माणूस भ्रमित झाला आहे. मात्र सर्वश्रेठ गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित अधिकारी व्यक्तींकडून अध्यात्माचे ज्ञान प्राप्त केल्यास हा भ्रम दूर होईल. त्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक
आहेत.माझा मोबाईल- ९७६७०९३९३९
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply