एक राजा होता. त्याला मासे खाण्याची प्रचंड आवड होती. एक दिवसही मासे खायला मिळाले नाही तर तो अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे त्याच्या भोजनात रोज मासळी असायचीच. काशीराम नावाचा एक गरीब मच्छिमार रोज समुद्रावर जायचा व ताजी मासळी पकडून राजवाड्यात घेऊन जायचा व राजाच्या आचार्याला द्यायचा. मात्र पहाऱ्यावर असलेला कोतवाल फार लबाड व भ्रष्ट होता. तो राजवाड्यात जाण्यासाठी काशीरामकडून रोज थोडेतरी का होईना पैसे घ्यायचा. कोतवालाच्या या मुजोरीला काशीराम कंटाळला होता, परंतु कोतवालाविरुद्ध तक्रार कशी करायची? म्हणून त्याचा नाईलाज झाला होता. एकदा मासे पकडण्यासाठी काशीराम नेहमीप्रमाणे समुद्रावर गेला. मात्र समुद्र खवळला होता. त्यामुळे तो मासेमारी न करताच घरी परतला. त्या दिवशी राजाच्या भोजनात ताजी मासळी नव्हती त्वामुळे राजा खूपच संतप्त झाला होता. दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. काशीरामला हे कळताच तो तिसऱ्या दिवशी पुन्हा समुद्रावर गेला. समुद्र खवळलेलाच होता. तरीही त्याने जीव धोक्यात घालून मासेमारी केली व ताजी मासळी घेऊन राजवाड्यात गेला. कोतवालाने त्याला अडविले व तो त्याला म्हणाला, तुझ्याजवळची ताजी मासळी पाहून राजा खुश होईल व तो तुला नक्कीच बक्षीस देईल त्यातले निमे बक्षीस मला द्यावे लागेल हे तू लक्षात ठेव. भ्रष्ट कोतवालाला अद्दल घडविण्याची हीच संधी आहे, हे ओळखून काशीरामने कोतवालाची मागणी मान्य केली. कोतवालाबरोबर आलेल्या काशीरामला पाहून राजा खुश झाला व त्याने त्याला बक्षीस मागण्यास सांगितले. त्यावर काशीरामने बक्षीस म्हणून चाबकाचे वीस फटकारे मारा, अशी राजाकडे विनंती केली. राजाने त्याची ही विचित्र मागणी मान्य केली. दहा फटके खाल्यावर काशीरामने आता उरलेले फटके कोतवालाला मारा अशी राजाला विनंती केली. तेव्हा राजाच्या लक्षात खरा प्रकार आला. त्याने उरलेले दहा फटके कोतवालाला मारण्याचा आदेश दिला. शिवाय त्याला नोकरीवरून काढून टाकले व काशीरामला बक्षीस म्हणून सुवर्णमोहोराची थैली दिली.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply