१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .
7) कोरड्या केसांना मेहंदी, बदाम, एरंडेल तेल व तिळाचे तेल लावावे. त्यात स्निग्धपणा अधिक असतो. त्यातील एखादे तेल गरम करून लावावे.तेल लाउन झाल्यावर दोन – तीन तासात किंवा घरीच असाल तर ४-५ तासांनी केस धुवावेत म्हणजे धुळ, प्रदुषण केसात चिकटुन राहात नाही.य
घरात अॅलोव्हेरा असेल तर त्याचा गर काढुन लावला तर केस मऊ होतात.
8) शिकेकाई किंवा रिठ्याच्या पाण्याबरोबरच कोरड्या केसांना अंडे असलेला शाम्पू वापरावा.
9) मेहंदी डायमुळे केसांना कलरिंग होते. कंडिशनिंग होते. पांढऱ्या केसांना कलर येतो. मुळांना मेहंदी लावल्याने कोंडा निघतो. त्वचा स्वच्छ झाल्याने नवीन केस येण्यास मदत होते. म्हणून किमान महिन्यातून एकदा तरी मेहंदीचा केसांच्या मुळापासून शेंड्यापर्यंत डाय करावा.
10) मेहंदी भिजवताना केसांना पुरेल एवढी मेहंदी घ्यावी. केस काळे हवे असतील तर लोखंडी भांडे घ्यावे. एक कप चहापावडरचे पाणी घ्यावे. निलगिरी तेलाचे 3-4 थेंब, अंडे, लिंबू, आवळा पावडर घ्यावी.
11) मेहंदी डाय ज्या दिवशी करणार, त्याच्या आदल्या दिवशी एक ग्लास पाण्यात एक चमचा चहाची पावडर टाकावी. ते पाणी उकळावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यात अंडे टाकावे. अंडे चांगले मिक्स झाल्यानंतर आवळा पावडर टाकावी. हे मिश्रण घट्ट असावे. तयार केलेली मेहंदी चार ते सहा तास भिजवली पाहिजे. जेव्हा मेहंदी लावणार तेव्हा त्यामघ्ये लिंबू व निलगिरी तेल टाकावे.
12) दुतोंडी केस हे आरोग्य चांगले नसल्याचंच लक्षण आहे. त्यामुळे पालेभाज्या, बीट , कडधान्य, अॅव्हाकाडो, फळं असा चौरस आहार ठेवला तर केसंसुद्धा निरोगी राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply