नवीन लेखन...

असंच काहीतरी

“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार,निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन ही खात्री झाली…!!!

मग काय, मी…. माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो.मला अजून १ मैल चालायचे होते…..घरी परतायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची पुरेपूर खात्री मला होती…

थोड्याच वेळात लक्षात आले की आम्हां दोघांमधील अंतर कमी झाले आहे………..मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते…..!!!

माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून…….!!

आणि तो क्षण आला, मी त्या गृहस्थाला पार केले, मागे टाकले..!

हुर्र्‍ये..!
हुर्र्‍ये…!!
हुर्र्‍ये….!!!
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले,
जिंकलोच आपण…!?! जिंकलीच आपण स्पर्धा….!
स्पर्धा..?
याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.

मात्र जिंकण्याच्या ईर्षेने मी माझा नियमित रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो…… जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते…… आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली,अस्वस्थता वाढली. परत जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता…

असेच होते ना आयुष्यात सुद्धा..?
सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते –
सहकारी ?
शेजारी..?
मित्र?
नातेवाईक?,
यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते. मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.

कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हेही  ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.

कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की;…!!
कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच;….!!!
कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार;…..!!!
कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच;..!!!!
कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच;……!!!! कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच…!!!!

तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..?
हे पाहावे……!!!

आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे.
आनंदी रहावे…….!!!
बस्स…..!!
खतम….!!!!!

बघा पटतय का..?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..