नवीन लेखन...

अाठवण

एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत  होतो. एखाद्या चलचिञपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून चिञे जावीत तशी काॅलेजच्या अाठवणी भुर्रकन निघून गेल्या अाणि अाठवले काॅलेजचे ते सोनेरी क्षण……………

जीवनरूपी काटेरी वळणावर मार्गक्रमण करत असताना .वळीवाच्या पावसाप्रमाणे तू माझ्या जीवनात अालीस .बरं वाटलं जीवन जगण्याचा खरा अर्थ कळला.प्रेम भावना काय असतात हे तू माझ्या जीवनात अाल्यावर  कळले.खरया अर्थाने जीवन जगण्याला अर्थ अाला तूझ्यामुळेच. काॅलेजचे दिवस कसे भूर्रकन निघून जायचे काही कळायचे नाही.काॅलेजच्या पायरया उतरतच तूझी नजर मला धुंडाळायची. काॅलेजमध्ये मी दिसलो नाही तर तूझं मन लागायचं नाही. मी तुझ्याशी अबोला धरलो तर तू माझ्यावर रागावयाचीस. माझ्या हृदयी अाजही रंगतोय तु मांडलेल्या प्रेमाचा खेळ. हातात कुंचला अाणी कॅन्व्हास घेतला की तूच माझ्या डोळ्यासमोर तरळायचीस अन तूच माझी मोनालीसा व्हायचीस अन मी तूझा पिकासो. अापलं नातं लाजाळूच्या पालवीप्रमाणे कधिच कुणाला न समणारं. अापल्या नात्याचा अंत वाईट अाहे हे माहीत असतानाही अापण दोघांनी ते विष प्यायलो. अाणि अाज ते माझ्या जिव्हारी येतय.वाटलं नव्हतं तूझ्यासारखी सखी माझ्या जीवनात येवून  कधिच न शमनारं प्रेमाचं वादळ उठवून देईल. प्रेमाच्या राज्यात सर्व काही सुरळीत चालत असताना वाटलं नाही असा डाव अर्ध्यावर सोडून जाशिल. कधि पुसटशी कल्पनाही केली नाही कि अापण एकमेकांपासून ईतके दूर जावू. खरंच वास्तव काती कटू असते पण वास्तव नाकारता येत नाही. तुझ्या लग्नाला पाच सहा वर्षे लोटली असतील कदाचित तू सूखी असशील तूला माझी अाठवणही येत नसेल पण मी माञ तूझ्याच अाठवणीच्या साह्याने कित्येक राञ जागून काढल्या. अाठवतोय का तूला तो निरोपाचा दिवस मी तूझ्या रूमवर अालो होतो.डोक्यात एकाच विचाराने थैमान घातले होते तू मला सोडून जाणार .काय बोलावं काय नाही काही सुचत नव्हतं. हृदय भरून अालं होतं डोळ्यासमोर सगळीकडे काळोख दिसत होता.कुठं जावं नि काय करावं काही सूचत नव्हतं. वाटलं नाही जगू शकत तूझ्याविना पण तूझा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उम्मेद देवून जातो.

जेंव्हा अाठवणीच्या सागराला भरती येते

तेंव्हा कशात मन लागत नाही तुला येवून भेटावेसे वाटते    पण उजाडणारा प्रत्येक दिवस मला जीवंत जाळत असतो

तुझी ती अबोल प्रित स्मरताना………………………

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..