रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष किरण शास्त्र करीत असे. यामध्ये धमनीमधून रेडिओ-ओपेक औषध इंजेक्ट करुन त्या भागाचे पटापट एक्स-रे काढत असत (सिरीअल चेंजर) कारण रक्तातून जाणारे औषध काही सेकंदातच दिसेनासे होते !
याचा मुख्य उपयोग न्युरोसर्जरीमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा व मेंदूचा अप्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी होत असे. मेंदूमधील रक्तवाहिन्यांचे जाळे जर नेहमीपेक्षा विचित्र दिसले, तर मेंदूच्या रोगांचे निदान केले जात असे.
पोटातील मोठ्या धमनीमध्ये औषध घालून पोटाच्या सूक्ष्म धमन्यांच्या प्तिमा काढल्या जात असत. या तपासात सर्वात प्रथम रक्त, धमन्यांच्या शाखा व त्यानंतर कॅपिलरीज (सूक्ष्म रक्तवाहिन्या) यामध्ये व सर्वात शेवटी नीलांचे जाळे व शेवटी मोठी निला यामध्ये हे औषध काही क्षणात फिरते. म्हणूनच प्रथमच याचे ८-१० एक्स-रे असत; परंतु क्ष किरणांच्या इमेज प्रगतीमुळे हे सर्व चित्र बदलले.
टी.व्ही. वरती हा रक्ताचा प्रवास स्पष्ट दिसू लागला. याला असा अडथळा होता की, हाडे व काही इंद्रिये दाट असल्याने या रक्त वाहिन्या स्पष्ट दिसत नसत. परंतु हा अडथळा कॉम्प्युटरमधील डिजिटल सबट्रॅक्शन या तंत्रज्ञानाने दूर केला की, ज्यामध्ये फक्त हाडांची प्रतिमा, ही हाडे अधिक रक्तवाहिन्या यांच्या प्रतिमामधून वजा होऊन शिल्लक राहिलेली फक्त रक्तवाहिन्यांचीच प्रतिमा दिसते व रक्तवाहिन्यांचे जाळे स्पष्ट दिसते.
हा तपास हृदयाच्या छोट्या धमन्या “कॅरोनरीज” मध्ये होणार्या गुठळ्या किंवा अरुंद भाग यांचा तपास करुन विविध पद्धतीने हे रोग सुधारण्यासाठी उपयोगात आणला जातो.
शरीराच्या जांघेतून अथवा खांद्यातून एक नळी तिथल्या धमनीत घालतात, त्य
नळीत एक गाईड वायर म ्हणजे मुख्य वायर असते, जी स्क्रिनिंगवर (टी.व्ही. वर) बघून मुख्य धमनीकडे सरकवली जाते व इंजेक्ट केलेले औषध त्या भागात सोडून त्या रक्तवाहिन्यांचा अभ्यास केला जातो.
हृदयात मुख्यत्वे आडलेल्या रक्तवाहिन्या तर इतर ठिकाणी आडलेल्या रक्तवाहिन्या व रक्तवाहिन्यांना झालेला फुगा (अॅन्युरिझम) किंवा जन्मत: विस्कळित झालेले जाळे, जे फूटून एकदम कधीही रक्तस्त्राव होऊ शकतो याचा तपास होतो.
हा तपास नुसताच निदान करणारा नसून त्यामध्ये अनेक उपायही होतात. अरुंद झालेली रक्तवाहिनी आतमध्ये फुगा फुगवून रुंद करता येते व ऑपरेशन टळते. तसेच जन्मत: फुगलेल्या रक्तवाहिन्याचा फुगा ब्लॉक करुन फुगा फुटण्याचा धोका टाळता येतो. ट्यूमरमध्ये वाढलेला रक्तपुरवठा ब्लॉक करुन ऑपरेशनमध्ये होणारा मोठा रक्तस्त्राव कमी करता येतो.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply