आई आहे ईश्वराच्या आधी
पवित्र जगाची या निर्माती
म्ह्णून झुकतो तिचा निर्माता
ईश्वरही तिच्या चरणावरती !
आई प्रेमळ प्रतिबिंब छान
प्रेम जगाला देणारी ती
प्रेमाची मग शोभावी एक
छान प्रेमळच परिभाषा ती !
आई आहे शब्द पहिला
बाळ नेहमी जो उच्चारतो
मायबोलीत आईच्या त्या
बोलायला तो जसा लागतो !
आई जगती गुरु प्रथमच
जन्म घेणार्या जीवाचा ती
म्ह्णून जगी सारे म्ह्णती
आई आहे गुरु थोर ती !
आई आहे एक गोड नातं
म्ह्णून म्ह्णते मला बाळ ती
जिवाचे मोल देऊन तिच्या
रक्षण माझे करते मग ती !
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
Leave a Reply