नवीन लेखन...

आजचे युग



आजच्या जगात काय काय नाय घडतयं

मांजर सुद्धा चक्क डोळे उघडून दूध पितयं

सुर्य उगवतो आपल्या भव्यतेचं दर्शन घडवतो

चंद्र उगवायच्या आधीच जीव घेऊन पळतो

पूर्वी रिक्षा धावत होती प्रवाशांमागे

आता प्रवाशी रिक्षामागे धावतायं

शिकारच शिकारीचा पाठलाग करतायं

शिकारी मात्र डोक्यावर पाय घेऊन पळतायं

संगणक युगाने तर जग उलथंपालथं केलं

धरती गेली आकाशी अन आकाश भूवर आलं

डबक्यातल्या बेडकाचं आता राज्य संपल

डबके सोडून साता समुद्री साम्राज्य पसरलं

जोराचा झटका आता जोरानेच लागतो

कुत्रा दळतो अन् आंधळा पिठ खातो

कॉलेज कट्टयावर मुलांऐवजी मुलीच दिसतात

त्यात काय नवलाई पोरंं पंजाबी डेस घालतात

तरूणाई आणि फॅशनची अशी गट्टी जमली

पट्टयानं चक्क फॅशनच्या मुस्कटातच लावली

मंत्री-महोदयांना असहय झाली उन्हाची काईली

अन् आचारसंहितेत लाल दिव्याची गाडी धावली

माणसाच्या नितिमत्तेच तर विचारूच नका

स्वार्थ अन् मोहापायी घेतला दुर्गुणाचा वसा

हरिणं म्हणते वाघोबाला करशील माझी शिकार

पळ-पळ पळवून तुला सैर जंगलाची करेल छान

इंचभर पोटासाठी माणूस धाव धाव धावतयं

इंचभर पोटासाठी माणूस धाव धाव धावतयं

निती, तत्व अन् चारित्र्याची राखरांगोळी करतयं

स्वार्थ अन् लोभापायी रक्त-नातं हवेत विरतयं

देहभान हरपतयं, स्वत:च स्वत:ला विसरतयं

काय झालास तु आणि काय तु होतास?

खाऊन खाऊन किती खाणार आहेस पैसा

जेवढा खाशील पैसा तेवढा आजार मोठा

मरण यातनांचा तुला अजिबात नसेल तोटा

— अनिल शिंदे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..