शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे.
जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का?
सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे कोण चालवतील, इतर व्यवस्था कशी चालेल.
एक पुस्तक वाचत होतो त्याच नाव आहे Rich that man poor that man” खूप छान पुस्तक आहे त्यात एक उदा. दिलं आहे की एक Gov नौकरी करणारा आणि एक व्यावसायिक यांचं मासिक उत्पन्न सांगितलं आहे, Gov नौकरी करणाऱ्याला महिन्याचा 30 हजार मिळतो तर व्यावसायिकाला दर दिवसाला 300 रु.मिळतात पण ते दुसऱ्या दिवशी दुप्पट होत असतात.आता हे कसे तर gov जॉब करणाराही 8 तास काम करतो पण त्याला जॉबवर ठेवणारा व्यक्तीही 8 तास काम करतो दोघांकडे वेळ सारखा पण व्यावसायिक मात्र असे 8 तास काम करणारे बरेच व्यक्ती ठेवतो आणि सगळ्यांपेक्षा जास्त Income कमावतो.
फक्त आपली विचारशक्ती बदला, ज्या क्षेत्रातही काम कराल ते असं करा की तुमच्यासारखा कोणताच व्यक्ती ते करू शकत नाही, ” दुनिया झुकती है बस ऊसे झुकानेवाला चाहिये” जर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी इ.हे तर खूप मोठे नाव झाले असेल याहीपेक्षा एक जळगावचा माझा मित्र अविनाश (MBA) फॉरेन मधून चांगली नौकरी सोडून इथे महाराष्ट्रात शेळ्यापालनाचा व्यवसाय करतो आणि शानने BMW गाडीत फिरतो, म्हटलंन आधीच कि सोच बदलो जिंदगी बदल जायेगी,
स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही, वेळ गेल्यावर हात हालवण्यापेक्षा वेळेआधीच जागे व्हा, आणि पालकांनो तुम्ही सुद्धा तुमचे विचार बदला,तुमच्या मनातील भूत बाहेर काढा, मुलांना समजून घ्या.
“तुम बदल गये तो सारी दुनिया बदल जायेगा
— प्रा. हितेशकुमार एस. पटले
Leave a Reply