नवीन लेखन...

आज ७ ऑगस्ट – नागपंचमी

आज ७ ऑगस्ट, नागपंचमी

1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही.

2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो.

3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो.

4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प असते, त्या मुळे सिनेमात दाखवतात तसे नागीण बदला घेत नाही.

5. शक्यतो हा प्राणी मनुष्याला  घाबरतो व लपून राहण्याचा किव्वा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घाबरू नका.

6. नाग कंपनाने (vibrations) सुद्धा जवळपास कोणी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गुरखा म्हणून रात्री काठी वाजवतो, साप व नागाला दूर जाण्यासाठी प्रोत्साहित करतो.

7. नागाला कान नसतात, तसेच त्याची नजर तीक्ष्ण नसते.

8. नागाने 1 बेडूक किव्वा उंदीर खाल्यास त्याला किमान 15 दिवस अन्नाची गरज नसते.

9. नागपंचमीला त्याच्या डोक्यावर हळद किव्वा कुंकू टाकू नका, यामुळे त्याला इजा होऊ शकते.

10. नागाला पुंगीचा आवाज ऐकू येत नाही, गारुडी पुंगी हलवतो, म्हणून नाग ते पाहून झडप घेऊन चावण्यासाठी स्वतः हलतो, ज्याला काही मूर्ख लोक डोलणे समजतात.

थोडक्यात सांगायचे तर हा सण बंद करावा, किव्वा त्या दिवशी सर्व शाळेत सर्प घराण्यातील जीवांची मुलांना माहिती द्यावी ज्यामुळे त्यांच्यातील भीती व गैर समज दूर होण्यास मदत होईल. 21 व्या शतकात आलो आहोत याचे भान ठेवा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको.

आपणास कोणीही नाग सापाचे खेळ दाखवताना दिसल्यास पोलिसांना खबर द्या, त्याच्या जवळचे प्राणी जप्त करा, आणि सुजाण नागरिक आहेत हे उदाहरण देऊन सिद्ध करा.

We were country of snake charmers, now we are country of mouse charmers. Lets now work hard to rule world with mouse in hand.

पूर्ण लेख वाचल्या बद्दल, आभारी आहे

— विजय लिमये
9326040204

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..