नवीन लेखन...

आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

 

भ्रष्ट्र राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

 

 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

 

 

भगवान श्री कृष्ण यांनी अर्जुनाला युद्धाच्या रणांगणात भर युध्दामध्ये गीता सांगत आहेत. हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो…..

 

 

…आणि भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून भारतीय जनता सामान्य माणूस महाभारत संपल्यावर आणि विशेषत: गेली ६३ वर्षे त्या भगवंताची वाट पाहत स्वातंत्र्यात कसेबसे दीवस कंठत आहे. पण आजच्या भारताची दुरवस्था पाहता भगवान अजून या देशाचा किती सत्यानाश होई पर्यंत प्रकट होण्याची वाट पाहणार आहे? हा प्रश्न निर्माण होतो. आजचे शासनकर्ते पाहीले म्हणजे कोरव दुशासन कंस दुर्योधन या पेक्षा वेगळे असतील असे वाटत नाही.आणि तरीही भगवंत कोठे चिरनिद्रा घेत झोपले आहे समजत नाही….. की आज आपण अवतार घेतला तर हे आजचे शासनकर्ते मलाच गुन्हेगार म्हणून सिद्ध करून शिक्षा करतील या भीती मुळे नको तो अवतार असा विचार करून भगवंत चिरनिद्रा घेत असतील. अशी शंका भारताच्या सद्य दुरवस्थेस पाहून येते.

 

 

आज वर्तमानपत्रात ( लोकसत्ता ) संपादकांचा अग्रलेख वाचला. आता पंजाब मधील शेतकरी सुद्धा रासायनिक खते, पाण्याचा बेसुमार उपसा, यामुळे शेत जमिनीचा झालेला सत्यानाश आणि वर अंगावर कर्जाचा डोंगर या भारतीय शेतकऱ्याला वर्षानुवर्षे पिडणाऱ्या त्रासा मुळे आत्महत्या

करत आहे . हे वाचले, आणि २१व्या शतकाच्या

गप्पा मारणाऱ्या आपल्या राजकारणी लोकांना याची लाज कशी वाटत हा प्रश्न ? मनात निर्माण झाला . पंजाब सारख्या सुजलाम सुफलाम ची ही दुरवस्था तर इतर राज्यातील शेतकऱ्यांची काय दुरावस्था असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे खते आणि बी-बियाणाचा तुटवडा सुरु झाला. ऐन पेरणीच्या वेळीच या वस्तू गडप होतात. दर वर्षी खता करता शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागतात.सरकार, नोकरशाही , लोक प्रतिनिधी, राजकारणी शेतकऱ्यांचे मसीहा म्हणवून घेणारे काय झोप काढतात. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात खता साठी शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागत आहे.

 

 

खत-बीबियाणे पुरवणे हा कांही फार मोठ्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रसंग नाही. एव्हडे साधे नियोजन यांना करता येत नाही तर खुर्ची वर राहण्याचा यांना काय अधिकार ? जनतेला २१व्या शतकात नेण्याची स्वप्ने दाखवून त्यांच्या जीवावर किती दीवस हे राजकारण करणार.आज भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात नोकरशाही, शासनकर्ते राजकारणी पूर्णपणे अडकली आहेत.फक्त पंतप्रधान, अध्यक्ष प्रामाणिक आहेत म्हणून ढोल बडवण्यात अर्थ नाही. माणसाची किमत त्याच्या आसपास असणार्‍या वावरणाऱ्या माणसा वरून त्याच्या मित्रा वरून ठरत असते . आणि यामुळे या पंतप्रधान, अध्यक्ष यांच्या भोवती जी भ्रष्ट्राचाराची भुतावळ फेर धरून नाचते, ते पाहीले की यांना स्वच्छ चारित्र्याचे म्हणणे सामाजिक,आर्थिक नित्तीमतेचा अपमान करणे होय. इंडियन मेडिकल असोसिअशन चा भ्रष्ट्र अध्यक्ष १२०० कोटी बेहिशोबी मालमत्ता जमा करतो पण यांना समजत नाही. कालच रेल बोर्डाच्या मुलाला एक एक परीक्षा पेपर ३.५ . ४ लाखाला

 

विकल्या मुळे अटक झाली. रेल बोर्ड काय, मेडिकल असोसिअशन काय या सर्वांवर केंद्राचे सरळ नियंत्रण आहे. हे उच्चभ्रू लोक नेहमी मंत्री गणात वावरत असतात. CBI पासून ते सर्व यंत्रणा हाताशी असताना शासन , पक्ष प्रमुखास हे काळे कारनामे माहित नसतात हा सर्व प्रकार म्हणजे सो चुव्हे खाके बिल्ली चल्ली हज को असा आहे. जो पर्यंत हिशोब वर पोहचत होते मांजरा सारखे सर्व जण डोळे मिटून होते. लाच घेण्याच्या पैशाने कोट्टीच्या कोटी उड्डाणे पार केलीत तरी पण हे प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे म्हणून मिरवत असतात. यांचे चेले यांच्या आरत्या गातात मेरा देश महान म्हणत जय हो च्या घोषात सामान्य माणसाचा आवाज दाबून टाकतात.

 

 

भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्या वर भाषण ठोकताना लाचखोर , भ्रष्ट्र साठेबाजांना जाहीर फाशी देण्याचे भाषण ठोकले होते. आता बदललेला त्यांचा तरुण नेता तीच भाषा करतो पण यांनाच काय संसदेवर हल्ला करणार्‍यांना, मुंबईवर हल्ला करणार्‍यांना ,दंगलखोरांना सुद्धा फाशी देण्याची यांची हिम्मत होत नाही. एवढे हे षंढ झाले आहे.महात्म्याच्या अहिंसाच्या नसबंदीचे हे मोल आपण अजून किती दीवस चुकवणार? दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या सर्वात मोठ्या भयानक, अंगावर काटे आणणाऱ्या अमानुष ,

 

मानवजातीस काळीमा फासणाऱ्या भोपाळ हत्त्याकांड कत्तलीस जबाबदार असणार्‍यांना साधी शिक्षा ही होत नाही. बेशरमपनाच कळस म्हणजे या कत्तलीस जबाबदार असणार्‍या कारखाना मालकास भारतातून पळून जाण्यास आमचे त्या वेळचे सर्वोच्च राजकारणी मदत करतात,ही गोष्ट जनते पासून लपवतात आणि पापाला वाचा फुटल्यावर बेशरमपणे कायदा सुव्यवस्था ,शांतता राखण्यासाठी त्या गुन्हेगारास पळून जावू दिले असे निर्लज्जपणे सांगतात. अमेरिकन सरकार, कंपनी या हत्त्याकांडा ला आम्ही जबाबदार नाही म्हणत हात वर करतात आणि आपले भ्रष्ट्र नेते यांचे तळवे चाटत डोवू DOW कंपनीला परत एक हत्त्याकांड करण्यास मुक्त परवाना देतात. त्याच बरोबर आपल्या फसलेल्या वीज नियोजनाच्या पापाची जबाबदारी न घेता, पाप न फेडता आण्विक वीज निर्मिती चे नवीन ढोल

वाजवले जातात. अमेरिकन कंपन्यांच्या फायद्या साठी कारखान्याच्या सुरक्षिततेचे , दुर्घटनेच्या जबाबदारीचे, कोणतेही कायदे न करता

भारतीय सामान्य जनतेला परत एका मृत्यू तांडवात ढकलले जात आहे.

 

 

आज भारतास भगतसिंह,आझाद,सुखदेव,राजगुरू , उधमसिंघ यांची गरज आहे. उधमसिंघ ज्याने इंग्लंड मध्ये जावून Scott ला मारून जालियानवाला बागेच्या हत्त्याकांडाचा बदला घेतला . आज अंडरसन भारतात येत नसेल अमेरिका त्यास संरक्षण देत असेल तर तेथे त्याच्या मायदेशात जावून ठार करून भोपाळ वासियांना न्याय देणारा आणि भारतीय उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

 

It Happens Only In India !!!! ?

— ठणठणपाळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..