नवीन लेखन...

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत ‘”दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता” अशी वाच्यता होती.  तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने  अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला.  आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या  दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात  ठुमके धन्यता मानू लागले. 

आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही).  जनतेने हि  अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे.  बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने ‘कुत्र्यांचे भुंकणे‘ याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील  गवर्नर श्री  राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).

यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना  घडल्या.  २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले.  पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही.  विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले  मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार  विरोध करीत नाही,  तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.  

आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले.  आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची  निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद  सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..