आत्महत्येच्या बातम्या आता सर्रास वाचायला आणि पहायला मिळतच असतात वर्तमानपत्र आणि टी.व्ही.च्या माध्यमातून. पूर्वी आत्महत्येच्या बातम्या लोकांना व्यतीत करायच्या पण ह्ल्ली त्या बहुदा तश्या करत नसाव्यात. आता समाजात सामूहीक आत्मह्त्येच प्रमाणही वाढू लागलय. लोकांच्या आत्मह्त्ये बाबत आता समाजमनही उदासिन होऊ लागलय. त्यामुळेच की काय हल्ली शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषयही मागे पडलेला दिसतो निवडणूका तोंडावर असतानाही. त्यात नियमित होणारे अपघात आणि त्यात कधी – कधी नाहक जीव गमावणारे शेकडो लोक या शेकडो लोकांच्या मृत्यूच्या बातमीपुढे एखाद्याच्या आत्मह्त्येला महत्व ते काय मिळणार. वाढती लोकसंख्या, वाढती बेकारी आंणि वाढत्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांमुळे लोक इतके हैराण झाले आहेत की त्यांचा सामना करण्या ऐवजी लोकांना आत्महत्या करणे अधिक सोप्पे वाटू लागले आहे. लोकांना आत्मह्त्या करण्याला कधी – कधी प्रेमभंगासारखी फुटकळ कारणेही पुरेशी ठरतात हा भाग वेगळा.
— निलेश बामणे
Leave a Reply