९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. मृत्यु आपल्या हाती नाही, म्हणून जगणे व जगावयाचे म्हणजे कष्ट करणे हे तीचे समिकरण होते. तसे तीचे आपले स्वतःचे कुणीही नव्हते. न मुलबाळ. नवरा तर ३०-३१ वर्षापुर्वीच वारला. काळ जबरदस्त धक्का तीच्या जीवनाला देत पुढे पुढे चालला होता. कट्टर सनातनी घराणे. तीला काळानुसार केशवपन करावे लागले होते. फक्त दोन लाल रंगाची लुगडी, तेवढीच तीची संपत्ती. व कष्ट करण्यास चांगली प्रकृती.
आत्याआजी आमच्या घरी असलेली, मी माझ्या बालवयापासून बघत आलो होतो. एक विचीत्र गुंतागुंतीची भावना, अनेक प्रश्न तीच्या विषयी माझ्या मनांत डोकावत. मलाच त्याची उत्तरे शोधावयाची होती. आणि तशी योग्य संधी मला मिळाली. मी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला व शासकीय नोकरींत गेलो होतो. एक दिवस-
‘ आत्या आजी तुला एक प्रश्न विचारुं कां ‘? ती ‘हो ‘ म्हणाली.
‘तुला मुलबाळ, अपत्ये झालीच नाहीत ? की तुझी मुले जगली नाहींत ‘?
ती मजकडे बघून हासू लागली. कारण मी डॉक्टर होतो. व एक वेगळाच अलिखीत व्यवसायीक आधिकार प्राप्त होता.
‘खर सांगु तुला. ते आमच्या लग्नानंतर, माझ्या सहवासांत ४० वर्षापेक्षा जास्त काळ होते. परंतु माझा त्यांच्याशी केंव्हांच संसार झाला नाही. ‘
मी तीचे असे शब्द ऐकून अवाक झालो. भयंकर अचंबा वाटला. ‘ काय म्हणतेस तू हे आत्याआजी. ? अण्णा आजोबाशी तुझा केंव्हाच संसार झाला नाही ? तु तुझे सारे जीवन संसार सुखाच्या अनुभवाशिवाय घालविलेस ? ‘
ती पुनः हासू लागली. ‘ अरे कसले संसारीक सुख. विवाहमधला सर्वांत महत्वाचा धागा असतो. तो संसार सुखाच्या त्रिकोणचा. हा लैंगिकता, प्रेम, व आकर्षण ह्या भावनांच्या बाजूवर उभारलेला असतो. हे सारे मी फक्त ऐकत होते. कोणताही आणि कधीही त्याच्या अनुभव सुखातून जाणे झाले नाही. ‘
‘ अग आत्याआजी परंतु अशी कोणती खोट वा अडचण तुमच्या वैवाहिक जीवनांत आली. ‘ ती त्या क्षणी पुन्हा हासू लागली. ‘ ते चांगले पुरुष होते. चांगल्या मोठ्या मिशा बाळगून होते. प्रकृति दणकट व पिळदार होती. परंतु ते एकदम नपुंसक होते. त्या काळी वैद्यकिय तपासणी देखील करुन घेतली. डॉक्टरानी त्यांच्या नपुंसकतेवर शिक्कामोर्तबही केले होते. कोणतेच उपाय शक्य नव्हते. लैंगिकसंबंधामध्ये एकदम हत्बल होते. घराणे मोठे, नांवलौकीक मोठा. वंश पुढे चालावा ही सर्वांची प्रबळ ईच्छा, भले मुलगा असो वा मुलगी. प्रथम सर्वानी मलाच दोशी ठरविले. त्यांचा दुसरा विवाह करणाचा प्रयत्न चालविला. मी कोणताच विरोध केला नाही. परंतु त्यानी स्वतः ला चांगलेच व पूर्ण जाणून घेतले होते. त्यानी हा ठराव धुडकावून लावला. पाण्यांत राहून तहानलेला म्हणतात, तसे मी माझे २ आयुष्य आतल्या आंत कुढत चालू ठेवले. ते माझ्यासाठी अवघड ठिकाणचे दुखणे झाले होते. फक्त वाच्यता न करता निमुटपणे सहन करणे. माझ्या कुचंबणेची कुणीही विचारपुस वा चौकशी केली नाही. ही होती त्या काळची संस्कृती व धर्माचरण. ‘
आज मला आत्याआजीची प्रखरतेने आठवण येऊ लागली होती. कारण होते एका मासिकामधला वैद्यकिय अहवाल. जो केंद्रीय शासनाच्या Social Sciences ह्या विभागानी २००७ साली प्रसिद्ध केला होता. थोडे थोडके नाही, जवळ जवळ दोन कोटी लोकसंख्या असलेला हा वर्ग भारतातला. यांची शारिरीक तपासणी अहवाल सांगतो की इतकी पुरुष माणसे ” लैंगिकतेमध्ये नपुंसक ” (Incompetent for Sexual Intercourse ) ह्या सदरांत जातात. ही प्रचंड संख्या होती. हा वर्ग लैंगिकता ह्या कार्यप्रणालीसाठी प्रकृतीने सक्षम नव्हता. त्यांची इतर शरीर प्रकृती, अंगकाठी, सर्व अवयव नॉर्मल होती. ही मंडळी बुद्धीने देखील तल्लख, समजदार, हूशार होती. मात्र त्यांच्यात लैंगिकता करण्यास ( Sexual Intercourse वा Transaction ) संपुर्ण अपात्रता होती. लैगिक अवयवांत ( शिश्न – Penis) उत्थापन होण्याची क्षमता नव्हती. त्यांचे आकार, रचना हे नॉर्मल नव्हते. विर्यरस उत्पत्ती ( (Semen’s Quantity and Quality in counts ) ही देखील खुपच कमी प्रमाणात होती.
शरीर संपदा, देहयष्टी, व्यक्तीमत्व ह्यात ते नॉर्मल होते. कमी पडत नव्हते. फक्त पौरुष्य ज्याला म्हणतात त्याची त्यांच्यात उणीव होती. त्याच लेखांत त्यांची अनेक कारणमिमांसा व्यक्त केली होती. त्यांत कौटूंबिक, वडीलोपार्जीत, Genetic, Familial, इत्यादी गुणधर्मा बरोबर जात, धर्मपंथ, खाण्यापिण्याच्या संवयी, स्थान, वातावरण, परिस्थीती, व्यसन, सवयी, मानसिकता, कांही रोग अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता.
मी हा रिपोर्ट वाचून फार बेचैन झालो. Sexual incompetence and Infertility विषयी तसे वैद्यकिय अभ्यासांत बरेच वाचले होते. परंतु अहवालामधल्या संख्याशास्त्राने त्यावर वेगळाच प्रकाश पाडला. मन सुन्न झाले.
स्त्रीया वरील अत्याचार, बलात्कार, बळजबरी संभोग, ह्या मनाविरुद्धच्या भयानक गोष्टी आहेत. आजकाल त्या खूपच वाढल्या आहेत. स्त्रीला ही उपभोगाची वस्तू, ही संकल्पना समजली जाई. परंतु त्याच वेळी स्त्रीयांवरील अत्याचाराची, एक दुसरी बाजू मज समोर आली. अनेक अनेक स्त्रीया आहेत की ज्या लैंगिक सुखापासून वंचित रहात असलेल्या दिसल्या. येथेही पुरुष प्रधानता, बळजबरी होऊन त्यांच्यावर गुलामा प्रमाणे अत्याचार मात्र होत राहतात. संसारगाडा चालविणे, घर चालविणे, कामे करणे, सारे होत राहते. फक्त लैंगिक सुख न मिळता. अनेक व्यक्ती व्यसन, दारु, गांजा, अफू, चरस, गर्द इत्यादीमध्ये सतत अडकले असतात. पैसा मुबलक. घरदार प्रशस्त. सार कांही जीवनाच्या गरजेच त्वरीत उपलब्ध. मात्र तरीही जीवनांत अंधःकार असलेला. ही माणसे लैंगिकतेमध्ये एकदम शुन्य. त्यांना कोणताच उत्साह, स्फूर्ती वा चेतना नाही. आहे मनोहर परी गमते उदास, अशी त्या स्त्रीयांची गत होते. बघणाऱ्याला तीच्या दुःखाची खरी कल्पना येऊच शकत नसते.
कित्येक व्यक्ती लैंगिकतेमध्ये सक्षम असतात, परंतु बाहेख्याली वृत्तीचे असतात. त्यांचे लक्ष बाहेर असते. निसर्ग पुरुषांत Sexual Intercourse साठी शरीरांत विर्यरस ( Semen ) तयार करीत असतो. तरुणपणांत ह्याची उत्पत्ती सुरु होते.
३ पुढे वयवाढी प्रमाणे कमी होत जाते. ठराविक दिवसांच्या अंतरानेच हा विर्यरस बनतो. विर्यरस व लैंगिकता याचा संबंध असतो. विर्यरस नसेल तर अवयवांत उत्तेजकता येत नसते. ही बाहेरख्याली माणसे त्यांचा विर्यरस कोटा बाहेरच गमवून बसतात. ह्यांत घरामधली हक्काची स्त्री, जीला संसारीक अधिकार प्राप्त असेल, ती वंचित राहते. तीला शरीर सुख मिळत नाही. हे एखाद्या बंदूकी प्रमाणेच असते. बंदूकीला महत्व त्याच वेळी जेंव्हा त्यांत गोळी असेल. अशी बाहेरख्याली अथवा नपुंसक माणसे ही फक्त शोभेसाठीच. एखाद्या भिंतीवर टांगलेल्या बंदूकीप्रमाणे. हे सारे न सांगता येणारे, काळानुसार लज्जेखातर स्त्रीयांनी सहन केले होते. सर्व आयुष्य बलीदान केले.
आता स्त्री आपल्या हक्काप्रित्यर्थ खुपच जाग्रुक झालेली आहे. धाडसी झालेली आहे. समजदार तर ती होतीच. आता जगाची व समोरच्याची तीला पूर्ण जाण आलेली आहे. कुणी दाद दिली नाही, तर ती हाती शस्त्रपण घेईल. आंता ती मागणार नाही, सारे खेचून घेईल.
बिचारी माझी आत्याआजी, त्या वेळच्या काळाला अर्थात परिस्थीतीला बळी गेली होती. भावनेचा कोंडमारा करीत जगली. मिठाची गुळणी तोंडात ठेऊनच आयुष्य जगत राहीली. फक्त धर्मबंधन म्हणून लादलेले ईश्वर नामस्मरण घेत.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply