नवीन लेखन...

एक आधुनिक अंधश्रद्धा – calcium supplementary

आताशा जाहिराती ह्या भावनिक आवाहन करताना दिसतात. बऱ्याचदा कळतच नाही नेमके काय सांगायचेय. नुकतीच एक जाहिरात पाहिली वृद्ध आजी आपल्या नातीला उचलून घेताना अवघडते, आणि मग मुलगी आपल्याला aware करते की वेळीच कॅल्शिअम supplements चालू करा म्हणजे म्हतारपणात आपल्याला सांधेदुखी होणार नाही……हे आणि अशा अनेक प्रकारचे भावनिक आवाहन आणि osteoporosis चा बागुलबुवा आपली बुद्धी गहाण ठेवण्यास मदत करतात.

हाडांच्या स्वास्थ्यासाठी एकच एक गोष्ट बिंबवली जाते ती म्हणजे calcium!! जन्माला आलेले तान्हे मुल असो अथवा गरोदर बाई ,बाळंत झालेली बाई आणि ४० च्या टप्प्यातील बाई, किंवा साठीच्या घरातील वृद्ध स्त्री या सगळ्यांना calcium supplements साठी अत्यंत गरजू म्हणून ठरवले जाते. Porous म्हणजेच हाडे आतून पोकळ होणे,कोरडी पडणे त्यामुळे सहजच तुटणे अथवा त्यांचे कार्य क्षीण होणे ! हे सगळे कशामुळे फक्त कॅल्शिअम कमतरतेमुळे?? याच्या जोडीला मग कॅल्शिअम शरीरात शोषून घेणारा विटामिन D सुद्धा कमी झालाय म्हणून त्याचेही supplement दिले जाते, अगदी लहान मुलांपासून मोठ्यान पर्यंत !!

आता वास्तव बघुयात ……..

शरीराची एक खूप समर्पक व्याख्या आहे, झिजते ते शरीर……एका ठराविक वयोमर्यादेनंतर शरीर झिजत जाणारच, निसर्गाचा नियमच आहे तो. या झिजत जाणाऱ्या शरीराची need फक्त कॅल्शिअम च असते का? आणि वाढीच्या महत्वाच्या टप्प्यातही फक्त ca च हवे असते का??? आणि गमतीचा भाग म्हणजे अशा प्रकारची supplements घेऊनही कुणाला काही फायदा होत नाही. सांधे दुखायचे ते दुखतातच आणि हाडे मोडायची ती मोडतातच !!!

उसने घेतलेले हे ca पोहोचते का हाडांपर्यंत ?? रक्तात त्याची पातळी वाढलेली दिसते फक्त आणि मग आपल्या मनाला समाधान वाटते की वाह वाढले आपले कॅल्शिअम.!!! आयुर्वेदिक कॅल्शिअम वगैरे सुद्धा एक myth आहे. मुळात या शास्त्राचे सिद्धांताच वेगळे आहेत.आमच्या कुठल्याही ग्रंथात कॅलशिअम चा उल्लेख नाही. मग हाडांचे स्वास्थ्य कळलेच नाही आयुर्वेदाला असे वाटू शकेल पण सांध्यांच्या अथवा हाडांच्या तक्रारी एक वैद्य जितक्या जास्त चांगल्या दूर करू शकतो तितके कुणीच नाही !!! कारण आयुर्वेद शास्त्र मुलभूत सिद्धांतांवर काम करणारे शास्त्र आहे……

नुकत्याच झालेल्या एका American research मध्ये असे निष्कर्षास आले की “theory of Ca supplement improving bone health is a myth “ अमेरिकेने सांगितलेय म्हणजे मग विश्वास ठेवायला हरकत नाही असा ट्रेंड असल्यामुळे मुद्दाम उल्लेख केला . आणि गमतीचा भाग म्हणजे US,CANADA या सारख्या highest calcium supplement घेणाऱ्या देशात Osteoporosis चे प्रमाण सर्वात जास्त आहे ( आहे न गम्मत ,पण हे कटू सत्य आहे).
तुम्ही जे calcium supplement घेत आहात, ते Coral Ca, Oyster Shell Ca, Calcium Citrate, or Calcium Carbonate यापैकी कुठलेही असो, त्याचे आपल्या शरीरात metabolism नीट होत नाही आणि वेगवेगळ्या soft tissue मध्ये ते साचून राहते ( deposition).असे साचून राहिलेले उसने घेतलेले कॅल्शिअम मग urine stone आणि वेगवेगळे blockages तयार करण्याच्या कामी येते.

खरी काळजी घ्यायचिये आपल्या हाडांची ??

या सांगाड्यावर आपला संपूर्ण देह उभा आहे. घेतलेल्या अन्नापासून हाडांचे पोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे अन्नाचे परिणमन योग्य होतेय की नाही हे बघणे आवश्यक आहे. हाडांमध्ये कुठेही कोरडेपणा येणार नाही याची काळजी घ्या.योग्य व्यायाम केल्याने मांस अथवा muscles मजबूत होतात आणि हाडांना मजबूत करतात. त्यामुळे हाडांमध्ये पोकळपणा येत नाही. घरी बनवलेले साजूक तूप, थंडीत आईने केलेले डिंकाचे लाडू असा पोषक आहार हाडांना मजबूत ठेवते. रात्री ची नियमित जागरणे, सतत चिंता करणे, सतत स्ट्रेस खाली राहणे तुमच्या शरीरातील स्निग्धता कमी करतात. स्निग्धता कमी झाल्याने शरीरातील हाडेच नाही तर सर्वच घटकांची झीज होते. अगदीच जागरूकतेने निसर्गाकडे पहिले तर ओले लाकूड सहजासहजी तुटत नाही आणि कोरडे लाकूड मात्र पटकन मोडते…….

.गर्भिणी मातेने जर परिपूर्ण स्निग्धता युक्त आहार घेतला ,आणि प्रसूती झाल्यानंतर सुद्धा आहारातून डिंक खाणे, साजूक तूप, खाण्यात शुद्ध तिळाचे तेल, नियमित अभ्यंग या गोष्टी तुमच्या ,आणि तुमच्या बाळाच्या हाडांना खऱ्या अर्थाने सुदृढ बनवतात.एकदा का तुम्ही गर्भिणी झालात की आयर्न आणि कॅल्शिअम ९ महिन्याचा सोबती होतो आणि अर्थात बालान्तपणानंतर ही ! आई आणि बाळाच्या शरीरात फक्त हे दोनच घटक असतात??? यांचीच वाढ होणे गरजेचे असते ?? आणि तीही अशीच supplement घेऊन???

म्हणून Calcium ची तपासणी करून ते कमी झालाय म्हणून उगाचच supplement घेण्यापेक्षा हाडांना सुदृढता द्या. उद्या असेही होईल की इतर प्रगत(?) देशांना अजून काही दिवसानी हाडांचे खरे स्वास्थ्य कळेल आणि आपलीच philosophy ते आपल्यालाच सांगतील आणि तेव्हा तुम्ही म्हणाल हे तर आमचे Ancient Wisdom !!!!!

So wake up think logically and follow ancient wisdom!!!

– वैद्य ज्योत्स्ना पेठकर©

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..