नाच रे पोरा शेजार्यांच्या मळ्यात
नाच रे पोरा नाच
झाडांवरी आंबे पिकले रे
पिवळे केशरी झाले रे
गंध किती छान छान
विसरुनी गेले भान
मुक्त पणे तू नाच ..नाच रे पोरा…..
माळ्याच्या डोळा चूकवून रे
सरसर झाडावर चढून रे
तोडून आंबे भरभर
उतर तू झरझर
गुपचुप पळू नाच ..नाच रे पोरा…..
मीत्रांची टोळी जमली रे
सार््यांना गुपीत समजलं रे
थोडेसे वाटून टाक
लपवून ठेव चार पाच
आनंदाने तू नाच ..नाच रे पोरा…..
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply