स्थळ: बालगंधर्व
वेळ: रात्रो ९.३०
“आनंदी आनंद” हे एक कौटुंबिक नाटक, कुटुंबातील प्रत्तेकाने सामील व्हाव अशी एक ‘हास्य यात्रा’.
काल बरेच दिवसांनी नाटकाला जाण्याचा “अमृत” योग आला. अमृत योग या कारणासाठी की याची तजवीज माझी एक गोडशी मैत्रीण अमृता हिने केली होती.
त्यामुळे सर्वात आधी अमृताचे आभार.
कसलेले कलाकार, पटकथा, सुरेख प्रकाश योजना, छान ध्वनी मुद्रण हि या प्रयोगाची एक जमेची बाजू
आनंदी आनंद या प्रयोगाची सुरुवात होते ती एका “प्रेमळ” अश्या सूचनेने, “कृपया सर्व रसिकांनी आपापले मोबाईल व मुले बंद ठेवावीत” आणि तिथेच एक हास्याची लकेर उमटते.
आणखी एक सूचना येते, “आपले डोके बाजूला ठेवावे” आणि रसिक राजा (यात काही पक्के पुणेकर आहेत जे समोरच्याने सांगितलेल्या गोष्टीच्या अगदी उलट वागू शकतात) या सूचनेची अंमलबजावणी करतात, हे पाहून खरच बर वाटल.
आंद्या (या कथेचा नायक), चंद्या (आंद्याचा मित्र), अर्चना/अर्चू/अर्चीझ (अंड्याची ‘लाडाची’ बायको), रघ्या उर्फ रघुनंदन (अर्चनाच्या माहेरहून आलेला नोकर) या सर्वांच्या भोवती हे कथानक फिरत राहत.
मिश्कील विनोद आणि कलाकार्मिंचे हावभाव या प्रयोगाला आणखी वजन देतात. मध्यंतरापर्यंत थोड्या थोड्या वेळाने हास्याची मुक्तपणे उधळण होत राहते.
पण जस मध्यंतर संपत आणि कथानक पुढे सरकत जात तसतशी प्रयोगाला रंगत चढत जाते. हास्याचे कल्लोळ ऐकू येऊ लागतात.
(पण काय सांगू मित्रांनो माझ्या शेजाऱ्यांनी मला हसून हसून जाम बेजार केल.
मला मध्ये त्यांना सांगावस
वाटल, “काका आपण आपल राक्षसी हास्य आवरल तर मला या नाटकाचे संवाद ऐकू येतील” )
यात आणखी काही मजेशीर कलाकार आहेत जे या कथानकाला एका वेगळ्या वळणावर नेतात. आता कोण आहेत ते आणि ते काय गोंधळ घालतात ते तुम्हाला हे नाटक पाहिल्यावरच कळेल.
रसिक वर्ग या प्रयोगाचा
पुरेपूर आनंद घेताना मला दिसला.
आपण सुधा आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून relax होण्यासाठी जर एखादा चित्रपट पाहण्याचा plan करत असाल तर या नाटकाला प्राधान्य जरूर द्या…
अगदी पुणेकरांच्या भाषेत सांगायचं झाल तर, “अरे लेका, पैसा वसूल…“
— योगेश गायकवाड
Leave a Reply