नवीन लेखन...

आपली संपत्ती चाललीये कुठे?



टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते. तिथे एअर कंडिशनिंग पासून संदेशांच्या देवाणघेवाणीपर्यंत सारे काही विजेवरच चालते. अनेक ठिकाणी वीज सातत्याने उपलब्ध नसते. अशा वेळी तिथे डिझेलवर चालणारे जनरेटर सेटस् वापरले जातात. ही सारी माहिती देणारी एक बातमी नुकतीच वाचनात आली आणि माझ्या मनात प्रश्न उद्भवला की, आपली संपत्ती नेमकी चाललीये कुठे?

मला जे म्हणायचंय ते सांगण्यासाठी मी एक उदाहरण घेतो. माझे आजोबा जळगाव जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक होते. नऊ मुले असलेल्या कुटुंबाचे लालन-पालन त्यांनी केले. त्यांच्या मुलांपैकी दोघं इंजीनिअर झाले, एका मुलगी डॉक्टर झाली आणि अन्य भावंडे ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट आहेत. सर्वांना चांगलं, आरोग्यपूर्ण आयुष्य जगता आलं. नऊपैकी सात मुलं अजूनही उत्तम आयुष्य जगताहेत. त्यांतल्या सर्वांत मोठ्या भावंडाचे वय सध्या ८४ आहे. माझे आजोबा कमावत असलेल्या पैशांचं भरपूर मोल त्यांना मिळाले, असं यावरून म्हणता येईल.

मी १९७७ मध्ये सीओइपीमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी माझ्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न २४,००० रु. होते. माझ्या शिक्षणावर पुण्यात ३२०० रु. खर्च झाले. म्हणजे माझ्या वडिलांच्या उत्पन्नाचा १३.३३ टक्के भाग. माझे वडील केंद्र सरकारमध्ये इंजीनिअर होते. त्या पदावर असलेल्या व्यक्तीचे आजचे वार्षिक उत्पन्न सुमारे ५ लाख असते. त्याच्या मुलाला आज इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी किमान १.२५ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे त्याच्या वडिलांच्या उत्पन्नाच्या २५टक्के भाग. काहीतरी ओढाताण करून ते हे करू शकतील.पण, खेडेगावातल्या किंवा लहान शहरातल्या शिक्षकाचे काय? त्यांना त्याला इंजीनिअर बनवता येईल का? किंबहुना फक्त नोकरीच्या पगारावर तो दोन मुलांचे पालन-पोषण करू शकेल का? प्रश्न इथे येतो की आपली संपत्ती गेली कुठे?

अलेक्झांडर २००० वर्षांपूर्वी ज्या देशात आला, ज्या देशाचं दर्शन घेण्याची आस युरोपिअनांना लागून आपली संपत्ती चाललीये कुठे राहिलेली होती, ते लोक इथे संपत्तीसाठीच तर इथे येत होते. त्यावेळी संपत्तीची व्याख्या वेगळी होती. ती संपत्ती इथे भरपूर होती.

आज संपत्तीची व्याख्या बदलली आहे. तेल, शस्त्रास्त्रं म्हणजे संपत्ती बनली आहे. उत्तम मोटारगाड्या आणि सिमेंटची जंगलं म्हणजे संपत्ती बनली आहे. १९४७ पूर्वी या देसावर ब्रिटिशांचं राज्य होतं. पण, ते आजही आपल्यावर हुकुमत गाजवताहेत की काय? वॉशिंग्टन आणि न्युयॉर्कमध्ये बसून अमेरिकी आपल्यावर राज्य तर गाजवीत नाहीत ना? ऊर्जा हे आजच्या घडीला सत्तेचं साधन बनलंय. आपण एक लीटर पेट्रोलसाठी ७०-७५ रु. मोजतो. तेलाचे भाव पिंपाला ३० डॉलरपासून दीडशे डॉलरपर्यंत वाटेल तसे चढतात, उतरतात. एवढे पैसे आपण का मोजतो? आपल्या वीजकेंद्रांसाठी आपण कोळसा ऑस्ट्रेलियातून आणतो. आपल्या शाळेतल्या शिक्षकांची संपत्ती अशा ऊर्जासाधनांपायी अकारण खर्च तर होत नाहिये ना? टेलिकॉम क्षेत्राला आवश्यक असलेल्या ऊर्जेबाबतची बातमी पाहिली की, अशा क्षेत्राच्या विकासासाठी मुद्दाम प्रयत्न तर केले जात नाहियेत ना? असा प्रश्न पडतो. आठ टक्के विकासाच्या मृगजळाच्या मागे तर आपण लागलेलो नाहीत, ना? ही शंका मन पोखरते. आपण सार्‍यांनी यावर विचार करायला हवा, आपापली मतं मांडायला हवीत, असं मला वाटतं.

– श्रीकांत आचार्य, पुणे

(आपले पर्यावरण या मासिकाच्या सौजन्याने)

— श्रीकांत आचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..