आमचा दीपावली विशेषांक कारण तो आंम्हा सर्वाच्या सहभागातून संपन्न झालेला आहे. मी जरी ‘साहित्य उपेक्षितांचे’ या मासिकाचा संपादक असलो तरी आमच्या मासिकाचा दिपावली विशेषांक मात्र माझ्या साहित्यिक मित्र-परिवाराच्या मदतीशिवाय काढणं मला शक्यच होणार नाही. या वर्षीचा आमचा दीपावली विशेषांक अवघ्या चौतिस पृष्ठांचा आहे. इतर दीपावली विशेषांकांच्या तुलनेत आमचा हा दीपावली विशेषांक फारच छोटा आहे म्ह्णा अथवा तो तसा असतो. दीपावली विशेषांक म्ह्टला की तो सर्वसाधारणतः सुजान वाचकांना साहित्यिक खादय म्ह्णून निदान दहा-बारा दिवस तरी पुरायला ह्वा अशी धारणा असते. पण आमचा दीपावली विशेषांक प्रत्येक वाचक काही तासात संपूर्ण वाचून दुसर्या वाचकाच्या हातात देतो वाचायला. आमचा दीपावली विशेषांक प्रत्येक वाचक संपूर्ण वाचतो याचा मला व्यक्तीशः खूप आनंद होतो. या वर्षीच्या आमच्या दीपावली विशेषांकासाठी सर्व वयोगटातील वाचकांचा विचार करून साहित्याची निवड केलेली आहे. आमच्या दीपावली विशेषांकाच्या सुरूवातीलाच मी संपादक म्ह्णून संपादकीय मध्ये आमच्या मासिकाच्या नावाबद्दल जे समज-गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या दीपावली विशेषांकाची सुरूवात वर्षा किडे-कुलकर्णी यांच्या ‘ईश्वरी’ या कथेने झालेली आहे ही कथा स्त्रियांच्या भाव-भावनांनवर आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसते. स्त्रियांच्या हृद्याचा ठाव घेणारी ही कथा स्त्रियांना वाचायला नक्कीच आवडेल. त्याच कथेच्या शेवटच्या पानावर माझी ‘प्रेमाच्या इतिहासात’ ही कविता आहे जी कधी तरी प्रेमात अपयशी झालेल्या प्रत्येकाला वाचायला नक्कीच आवडेल. त्यांनंतर आम्ही आमच्या या दीपावली विशेषांकात प्रत्येक कवीला एक स्वतंत्र पृष्ठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्ह्णून काव्य पुष्प –एक मध्ये निवृत्त शिक्षक श्री. भगवान पोसू म्हात्रे यांच्या जीवनधार व शिका…या विज्ञानवादी कविता शाळेय विद्यार्थ्यांना वाचायला नक्कीच आवडतील. त्यानंतर अशोक कुमावत जे व्यावसायाने शिक्षक आहेत ज्यांचा नुकताच ‘निर्धार’ हा कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे त्यांची ‘गोष्ट एका गरीबाची’ ही कथा खास करून विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशित केलेली आहे. त्यांतर डॉ. अपर्णा फडके यांच्या दोन इंग्रजी व दोन मराठी कविता प्रकाशित केलेल्या आहेत ज्या सृजनाशी संबंधीत आहेत त्यांच्या कविता पहिल्यांदाच आमच्या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या आहेत. व्यावसायाने उद्योजक असणार्या श्री. किरण भरणुके यांची ‘ऍड्मिशन’ ही कथा शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना दिसते त्यांचा ही हा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न वाचकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. त्याच कथेच्या शेवटी प्रकाशित झालेली साई कुमावत याची शहरी जीवनावर भाष्य करणारी कविता उत्तम आहे. त्यानंतर अशोक कुमावत यांची व्यसनमुक्तीवर भाष्य करणारी गेय कविता वाचकांना नक्कीच आवडेल. त्यानंतर माझी ‘लग्न’ ही संवादात्मक कथा लग्ना पासून दूर पळ्णार्या पुरूषांची मनोव्यथा व्यक्त करताना दिसते तसा तो संवेदनशील विषय असला तरी त्याला मी विनोदाचा तडका देण्याचा प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नात मी यशस्वी झालो आहे की नाही हे सुजान वाचकच ठरवतील. त्यानंतर जयेश मेस्त्री याच्या ‘गोजिर्या रे माझ्या फुला’ आणि ‘आय मिस यू’ या कविता वाचकांना वाचायला नक्कीच आवडतील. त्यानंतर व्यावसायाने शिक्षक असणार्या राजाराम पाटील यांच्या ‘मार्ग दावितो जीवन यशाचे’ ही मराठी कविता आणि निसर्गावर भाष्य करणारी एक इंग्रजी कविता वाचकांना नक्कीच आवडेल. त्यानंतर मी माझ्या आजीला डोळयासमोर ठेवून तिला श्रध्दांजली म्ह्णून लिहलेला ‘आमची आजी’ हा लेख सुजान वाचकांना नक्कीच आवडेल. रंगनाथ शेजुळे यांची ‘माळीणं गांव’ ही कविता माळीणं गावाच्या आठवणी पुन्हा जाग्या करताना दिसेल. वर्षा किडी-कुलकर्णी यांच्या कविता मनाला हळूवार फुंकर घालून झाल्यावर जयेश मेस्त्री यांचा ‘प्रेमकवी सावरकर’ हा लेख सावरकरांची एक वेगळी बाजू उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यानंतर सौ. प्रज्ञा बागुल यांच्या ‘सामाजिक बांधिलकी’ आणि ‘निरागस फुले’ या कविता सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसतात आणि आसावरी इंगळे यांची सती ही एक उत्तम कविता वाचकांच्या भेटीला येते. त्यानंतर माझी ‘हट्ट’ ही छोटीसी कथा आपल्या हट्टापाई सर्वस्व गमावून बसलेल्या तरूणाची व्यथा मांडताना शेवटी सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यानंतर जयेश मेस्त्री, निलेश मोरे आणि अमोल नारखेडे यांच्या तरूण कविता तरूण वाचकांना वाचायला नक्कीच आवडतील. आमच्या दीपावली विशेषांकाचा शेवट माझ्या खंत या लेखाने केलेला आहे कारण प्रत्येक माणसाला त्याच्या अंतापर्यत त्याच्या मनात कोठेतरी दडलेली एखादी खंत साथ करीत असते, कित्येकदा आपल्याला ती खंत सुखाने झोपू ही देत नाही आणि कित्येकदा तिच खंत आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्यासाठी प्रेरणाही देत असते. आमच्या या छोट्याश्या दीपावली विशेषांकात आंम्ही आमच भलमोठ भावविश्व उलगडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा हा प्रयत्न वाचकांच्या पसंतीस उतरतोय याचा आंम्हाला सर्वात जास्त आनंद होत आहे…
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65
मो.9029338268
— निलेश बामणे
Leave a Reply