दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ? महाराष्ट्रातच कशाला लोकसभेच्या पार्श्वभुमीवर हा विचार संपूर्ण देशातही केला जावू शकतो.
सर्वसामान्य मतदारांना काय ह्वं असत, त्यांच्या हिताचा विचार करणारं, त्याच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजणार, त्यांच्या मालमत्तेच आणि जीविताच संरक्षण करणार त्याचबरोबर त्याच्या मुळ्भुत गरजा पूर्ण करणार सरकार . देशातील निवडणुकीचा विचार करता आज आम आदमी पार्टीची ताकद कमी असेलही पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. दिल्लीत आम आदमी पार्टीला इतका कल्पनातीत पाटींबा का मिळाला आणि का मिळतोय ? या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याचा तरूण मतदार हा प्रश्न स्वतःला विचारणारच कारण एकेकाळी महाराष्ट्र हा देशातील सर्व राज्यांसमोरील आदर्श राज्याच उदाहरण होतं पण सध्याची महाराष्ट्राची स्थिती जगजाहीरच आहे. दिल्लीतील विजयानंतर जवळ्पास दिल्लीसारखीच विचारसरणी असणार्या महाराष्ट्रातीलच नव्हे देशभरातील शहरांकडे आम आदमी पार्टीने आपला मोर्चा वळ्वायला सुरूवात केली तर त्यात आश्चर्य वाटण्याच कोणाला कारणच नसेल. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकारण्यांच तेच ते रडगाण ऐकून आता लोकही वैतागलेत. भ्रष्टाचार करणारेच भ्रष्टाचाराच्या नावाने कोकळ्ताना दिसतात आणि काही बाबतीत तर खुळेआम भ्रष्टाचाराला पाटीशी घालताना दिसतात. सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता फक्त आश्वासनाच गाजर पुरेसा ठरणार नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जात- धर्म किंवा आरक्षण वगैरे संबंधीत गोष्टींचाही फारसा उपयोग होईल अस चित्र सध्यातरी दिसत नाही. कदाचित राजकारणातील तेच ते चेहरे बघूनही मतदारांना कंटाळा आल्याची शक्यताही नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायच तर नव्याने राजकारणात येवून काही करण्याची मह्त्वकांक्षा बाळगणार्या सर्व जाती – धर्मातील तरूणांसाठी आम आदमी पार्टी हाच उत्तम पर्याय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वच समस्या आता सर्वांनाच माहीत आहेत आणि वर्तमान राजकारणी त्या समस्या सोडविण्यास बर्यापैकी अकार्यक्षम ठरलेत त्याला काही अपवाद होते ते सध्याच्या राजकारणात अधिक प्रकाशित होताना दिसता आहेतच की. त्यामुळे जनलोकपाल सारखा मुद्दा जरी बाजुला सारला तरी देशात इतर समस्या कमी नाहीत त्या समस्या कोण सोडविणार हा प्रश्न मतदारांना पडणार नाही का ? सर्वसामान्य माणूस वेगवेगळ्या समस्यांनी जो चारी बाजूंनी भरडला जातोय त्याचा राग तो मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करणारच. वर्तमान राजकारणी देशातील समस्या सोडविण्यापेक्षा एकमेकांवर चिखळ्फेक करण्यातच अधिक व्यस्थ असल्याचे दिसतात. आम आदमी पार्टी जर खरोखरच देशाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणात कंबर कसून उतरली तर महाराष्ट्रातीलच नव्हे देशाच्या राजकारणलाही एक वेगळी दिशा मिळाण्याची शक्यता नाकारता येणार नाही .
— निलेश बामणे
Leave a Reply