नवीन लेखन...

आयफोन यंदा दहा वर्षांचा झाला

जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. मोबाईल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलचे सी.ई.ओ स्टीव जॉब्स यांनी ९ जानेवारी २००७ रोजी सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये क्रांतिकारी आयफोन सादर करून आश्चर्याचा धक्काच दिला होता. पहिल्या आयफोनच्या लॉन्चिंगवेळी अॅपलने म्हटले होते की, हा फोन एक मोबाईल, आयपॉड आणि डेस्कटॉप यांचे संयुक्तस्वरूप असेल. यामध्ये इंटरनेटची सुविधा, दोन बोटांचा वापर कारून झूम करण्याची सोय, व अनेक अॅप्लिकेशन्सचा समावेश होता! यानंतरच टचस्क्रीन फोन्सची संख्या वाढीस लागली. सध्या आयफोन हा ग्राहकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. पहिला आयफोन जरी दहा वर्षांपूर्वी ९ जानेवारी २००७ ला लॉन्च झाला असला तरी याची विक्री २९ जून २००७ पासून सुरू झाली. टचस्क्रीनसह ३.५ इंच डिस्प्ले असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या वर्षी अॅपलने या फोनच्या ६१ लाख युनिटची विक्री केली होती. २००८ या वर्षी आयफोनने ३G मोबाईल नेटवर्क आणि GPS ची जगाला ओळख करून दिली. अॅप स्टोअर आणि थर्ड-पार्टी अॅप इंटिग्रेशनचंही हे पहिलं वर्ष होतं. या फोनच्या लॉन्चिंग नंतर स्मार्टफोनच्या दुनियेत अनोखी क्रांती घडून आली आणि जगातील अनेक कंपन्या या अॅपलचा भागीदार होऊ लागल्या. नोव्हेंबर २००७मध्ये युके, जर्मनी आणि फ्रान्स मध्ये आयफोनची विक्री सुरु झाली. ऑगस्ट २००८मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोन लॉन्च करण्यात आला. या फोनला एअरटेल आणि वोडाफोनसोबत लॉन्चे करण्यात आले होते. त्यावेळी ८ जीबी मॉडेलची किमत ३१ हजार रूपये आणि १६ जीबी मॉडेलची किमत ३६१०० रुपये होती. आयफोन लॉन्ची केल्यानंतर २००७ पर्यंत अॅपलमध्ये अॅप स्टोर सारखी सुविधा देण्यात आली नव्हती. आयफोनच्या पहिल्या अॅपचे नाव अॅप स्टोर असे होते. २०१६ ने टाईम्स मासिकाने जगभरातील ५० प्रभावशाली गॅजेट्समध्ये अॅपलला सर्वात पुढचे स्थान दिले होते. जून २००७ नंतर अमेरिकेच्या उत्पादनात अॅपलचे महत्वपूर्ण योगदान होते. सप्टेंबर २०१६ मध्ये कंपनीने iphone 7 आणि iphone 7 plus हे दोन फोन बाजारात आणले. सध्या या फोन्सचं क्रेझ पाहायला मिळत आहे. 32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस 4 GB रॅम देण्यात आला आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. गेल्या दहा वर्षात या फोनने व्यक्तिच्या फोनवर बोलण्याच्या पद्धतीपासून ते जीवनशैलीपर्यंत पुन्हा परिभाषित केलं आहे. मात्र, ही तर केवळ सुरूवात आहे (The best is yet to come) सर्वोत्कृष्ट गोष्ट बाजारात येणं अजून बाकी आहे ” असं दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सध्याचे सीईओ टिम कूक म्हणाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..