या तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो. हा पदार्थ हाफ लाईफ कमी असल्यामुळे शरीरातून लगेचच लघवीतून बाहेर टाकला जातो, म्हणून यात धोका अजिबात नाही.
या मशीन्सचे तीन प्रकार असतात. न्युक्लिअर मेडिसिनचे मशीन, स्पेक्ट आणि पेट. आज आपल्याकडे स्पेक्ट उपलब्ध आहेत. त्यामध्ये संपूर्ण न्युक्लिअर मेडिसिनचा अभ्यास व मेंदूच्या मानसिक आजारापासून मेंदूचे दुसरे आजारही अभ्यासता येतात.
पेट मशीनमध्ये पॉझिट्रॉनचा उत्सर्ग करणारे पदार्थ असतात. याचा मुख्य उपयोग कार्यक्षमता अभ्यासण्यास होत असल्याने पेट स्कॅन रुग्णाच्या आजाराच्या मर्मापर्यंत पोहचू सकेल. याचा मुख्य उपयोग मानसोपचारात होतो.
आयसोटोप स्कॅनमध्ये टेक्निशिअम, थॉलियम, गॅलियम इत्यादी आयसोटोप्सचा वापर केला जातो. मुख्यत्वे संपूर्ण हाडांचा सांगाडा, फुफ्फुसे, मेंदू, हृदय, थॉयरॉईड व पॅरा थायरॉईड (गळ्यातील ग्रंथी), यकृत, मूत्रपिंडे यांचे स्कॅन होतात. हाडाचा पूर्ण सांगाडा एकदोन फोटोत दिसून कॅन्सरचा संपूर्ण पसारा (पसरलेला कॅन्सर) दिसून येतो. हाडांची छोटी फ्रॅक्चर्स दिसतात. दारु पिऊन खराब झालेले लिव्हर दिसते. थायरॉइड व पॅराथायरॉईडचे ट्युमर दिसतात. फुफ्फुसात झालेला एंबोलस (कमी रक्तपुरवठा), मूत्रपिंडाच्या महत्वाच्या भागाची कार्यक्षमता (कॉरटेक्स) दिसून येते.
हृदयाचा थॉलियम स्कॅन करुन कमी रक्तपुरवठा होणारा भाग व अजिबात रक्तपुरवठा न होणारा भाग (इनफार्कट) ओळखता येतो, ज्यामध्ये अॅंजिओग्राफीप्रमाणे कोणतीही नळी घालण्याची आवश्यकता नसते. शरीराचा गॉलियम स्कॅन शर
ीरात लपलेला पू शोधते व कारण न समजणारे ताप यांचे शोध घेते.
या स्कॅनची किंमत एक हजार ते तीन हजार रुपये आहे, तर थॉलिअम स्कॅन सुमारे पाच हजार रुपयात होतो. या तपासाला लागणारा वेळ, जितके
जास्त गॅमा कॅमेरे असतात, तितका कमीत कमी लागतो.
तरीही अर्धा ते एक तास धरावा; परंतु काही प्रकारांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर सुमारे तीन ते चार तासानंतर स्कॅन केले जातात. म्हणून आधी तपासाची माहिती करुन मगच जावे.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply