नवीन लेखन...

आयुष्य – एक वाचनिय कवितासंग्रह

sk01डॉ. शांताराम कारंडे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘आयुष्य’ हा कवितासंग्रह वाचला, या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असललेली डॉ. शांताराम कारंडे यांच्या चेहर्याडची फुसटशी प्रतिमा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सांगते तर चहाचे दोन भरलेले ग्लास आणि एक रिकामा ग्लास हे सांगतो की दोन ग्लासातील थोडा थोडा चहा तिसर्यात ग्लासात ओतला की तीन कटींग चहा तयार होतात त्या कटींगच्या माध्यमातून त्यांना काय सुचवायचे आहे हे त्यांनी आपल्या छोट्याश्या मनोगतात फारचं सुंदर रित्या मांडलेले आहे. याच मुखपृष्ठावर असलेले डॉ. शांताराम कारंडे यांचे डोळ्यावर चष्मा चढविलेले छायाचित्र आयुष्याकडे अनुभवाच्या चष्म्यातूनच पाहायला हवे हे सुचित करताना दिसते. या कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते लिह्तात…सदैव स्वतःचंच म्ह्णणं खरं करणार्यार… स्वतः चुकले तरी दुसर्यायला शिव्या देणार्या्… व आयुष्य कसं जगायचं ? हे अनुभवाने शिकायला लावणार्याा… माझ्या ‘बापाला’ अर्थात ‘तात्यांना’ अर्पण ! डॉ. शांताराम कारंडे या अर्पण पत्रिकेच्या माध्यमातूनही एक अस्पष्ट विचार मांडताना दिसतात. या कवितासंग्रहात ‘चौवेचाळीस’ कविता आहेत.

‘काय सांगू राजे… आम्हाला तरीही जगावं लागतं!’ या कवितेने या कवितासंग्रहाची सुरूवात होते आणि शेवट ‘जीवन… हे असंच जगायचं असतं!’ या कवितेने झालेली आहे. पहिल्या कवितेत डॉ. शांताराम कारंडे स्वराज्य तर मिळाले, पण सुराज्याचा पत्ता नाही हे काही उदाहरणांच्या माध्यमातून मांडताना दिसतात. तर शेवटच्या कवितेत डॉ. शांताराम कारंडे यांनी जीवन कसं जगावं हे अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे. ‘आयुष्याचा हिशोब’ या कवितेत कवीने खरोखरीचा आयुष्याचा हिशोब मांडलेला दिसतो आणि तो हिशोब यशाच्या मागे वेड्यासारखे धावणार्याय प्रत्येक माणसाला कदाचित आपल्याच आयुष्याचा हिशोब वाटल्या खेरीज राहणार नाही. ‘पाऊस’ या कवितेत पावसाचे अप्रतिम वर्णन केल्यावर पुढच्या ‘कामगार दशा’ या कवितेत रोजंदारीवर काम करणार्याे कामगारांची व्यथा मांडताना ते दिसतात. ‘कविता’ या कवितेत कवितेवर भाष्य करत ‘कर्तव्य आणि तकदिर’ या कवितेत कर्तव्य आणि तकदिर यांची सांगड घालत असताना पुढच्या ‘एक गोष्ट लक्षात ठेव’ या कवितेतून एक चांगला बाप आपल्या मुलाला काय उपदेश देईल हे मांडत असतानाच डॉ. शांताराम कारंडे ‘दुष्काळ्ग्रस्तांची होळी’ या कवितेतून दुष्काळ्ग्रस्तांची व्यथा ही मांडतात. ‘आई मला जगायचंय’ या कवितेतून ते स्त्री- भ्रूण हत्ये सारख्या समस्येला हात घालताना दिसतात. ‘वेश्या’ ही कविता या कवितासंग्रहातील अशी कविता आहे जी वाचकाला क्षणभर स्तब्ध करते. ‘मी दगडाचा आहे…म्ह्णूनच माझं बरं आहे!’ या कवितेत ते चक्क देवाची व्यथा मांडतात. असहाय,गढुळ,एक वेगळं जग या बोधपर प्रेम कविता आणि घरं या जिव्हाळ्याच्या विषयावर भाष्य करणार्याव ‘आडोसा’ आणि ‘माझ्या मनातील घर’ या कविता वाचायला मिळतात. पुढच्या ‘शिकवण’ या कवितेत डॉ.शांताराम कारंडे आपले पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत ही शिकवण देतात आणि त्या पुढच्या समाधानी, दुष्काळ्ग्रस्त, माणसापेक्षा झाड बरं !, विहार करत जगावे… आणि प्रश्न या कवितेतून डॉ.शांताराम कारंडे अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसतात. जाता जाता… आणि आर्जव या प्रेम कविताच आहेत.

12654242_186894241672146_4540174038260306576_n‘मरण’ या कवितेत डॉ.शांताराम कारंडे विश्वातील अंतिम सत्य अधिक प्रकरतेने मांडताना दिसतात. ‘आशा सोडलेली नाही!’ ही कविता सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करताना दिसते तर ‘कार्यकर्ता’ या कवितेतून डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील राजकारणी कवितेत डोकावताना दिसतो. प्रेमाचं चिन्ह, मी लहान होतो तेंव्हा या कविता भुतकाळात डोकावत असतानाच डॉ.शांताराम कारंडे यांनी साहित्यात उपेक्षित असलेल्या बापावर लिहलेली ‘बाप’ ही कविता डोळ्यासमोर येते आणि ती वाचल्यावर कोणालाही आपला बाप आठवल्याखेरीज राहणार नाही हे नक्की. ‘यात माझा काय दोष’ या कवितेत डॉ.शांताराम कारंडे स्त्रियांच महत्व पटवून देता देता ‘राहुनच गेले…’ देवपण, न्याय तुम्ही द्यायलाच हवा!, स्त्रीच्या प्रेमाची सर… या कविता वाचता वाचता ‘शेतकर्यांरची आत्महत्या!’ या कवितेत डॉ.शांताराम कारंडे शेतकर्यां ची व्यथा मांडल्यावर ‘भोळा शंकर’ आणि ‘विटंबना’ या कवितेतून देवाचीच व्यथा मांडताना दिसतात.

डॉ.शांताराम कारंडे यांचा हा कवितासंग्रह एकाच वेळी अनेक विषयांवर भाष्य करतो पण हा कवींचा कवितासंग्रह न होता सर्वसामान्य वाचकांसाठीचा कवितासंग्रह झालेला दिसतो. सर्वांनी आवर्जुन वाचावा असाच आहे डॉ.शांताराम कारंडे यांचा ‘आयुष्य’ हा कवितासंग्रह….

लेखक – निलेश बामणे,

मो. 8652065375

 

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..