
१९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना प्रयोगशाळेत मदत करायची. प्रयोगशाळेत काम करता करताच तिला विज्ञान आणि त्यातील संशोधनाविषयी आवड निर्माण होत गेली. पोलंडमध्ये त्या वेळी असलेल्या जुलमी सत्तेविरुद्ध क्रांतिकारकांनी बंड उभारले होते. देशभक्त मेरी क्रांतिकारकांच्या सभांनाही उपस्थित राहायची. मात्र सरकारला याची कुणकुण लागली व मेरीला अटक होण्याची वेळ आली. मात्र, यामुळे आपल्या विज्ञानाच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मेरी पोलंड सोडून परिसला गेली. सुरुवातीला तेथे तिला अतिशय कष्टात दिवस काढावे लागले. एका प्रयोगशाळेत ती तेथील बाटल्या धुण्याचे काम करीत असतानाच ‘ पियरे क्युरी ‘ या वैज्ञानिकाशी तिचा परिचय झाला व पुढे मेरीने त्यांच्याशीच विवाह केला. विवाहानंतर मेरीने पियरे करी यांना संशोधन कार्यात खूप मदत केली. उभयतांनी १८९८ मध्ये ‘ पोलोनियम ‘ चा तर त्यानंतर ‘ रेडियम ‘ चा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दलच त्यांना १९०३ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे पियरे क्युरी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मेरी खूरीने पुन्हा एकदा रेडियममधील आरोग्यदायी शक्तीचा शोध लावला व त्वाबद्दल तिला १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९१४ मधील पहिल्या महायुद्धात मेरी क्युरीने आरोग्य सेविका म्हणून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची सेवाही केली. त्यानंतर काही वर्षांनी तिचा साचू झाला. तिच्या मृत्युच्या कारणाबाबत डॉक्टरांमध्ये मतभेद होते. वास्तविक रेडियमच्या किरणोत्सर्गानी तिचे सारे शरीर पोखरले गेले होते. एका महत्त्वाच्या संशोधनासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले होते.
Leave a Reply