नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स…
दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं.
साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरुर प्या.
प्रशिक्षित प्रशिक्षक निवडा. जेणेकरुन भविष्यातील अपव्यय टाळता येईल.
वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
सकारात्मक विचारसणीचा अवलंब करा. जे तुम्हाला यश मिळवण्यास उपयोगी ठरेल.
ताजी फळं आणि सालाड खाण्यावर भर द्या.
एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. दिवसातून पाच ते सहा वेळा अल्पसा आहार घ्या.
हळुहळू आणि व्यवस्थित चावून खा. तुम्ही जेवढं हळू खाल तेवढं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
मानवी शरीराला दररोज अर्धा किंवा एक टिस्पून मीठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जास्त खाणं हा काही उपाय नाही.
दररोज ध्यानधारणा आणि प्राणायम करण्याची एक वेळ निश्चित करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.नमिता जैन
Leave a Reply