नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वाीसामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तलवाहिन्या असतात, यामुळे श्वा्सावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते. नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यजक असते.
गवती चहाचा काढा
नाकाशी संबंधित सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला त्रास म्हणजे नाक चोंदणे व सर्दी होणे. वरवर पाहता साधा वाटला तरी यामुळे व्यक्तीक बेजार होऊन जाऊ शकते. वारंवार सर्दी-पडसे होणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्तीह कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. अशा वेळी दीर्घ काळपर्यंत उपचार घ्यावे लागतात. साध्या सर्दीवर मात्र लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, गवती चहाचा काढा घेणे यासारखे उपाय करता येतात. गवती चहाचा काढा पुढीलप्रमाणे बनवता येतो.
पाणी – दोन कप
गवती चहा – दोन पाती
किसलेले आले – अर्धा चमचा
दालचिनी – एक इंच तुकडा
तुळशीची वा पुदिन्याची पाच-सहा पाने
हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. एक कप उरल्यावर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम पिण्याने सर्दीची लक्षणे कमी होतात, तापासारखे वाटत असल्यासही बरे वाटते.
नाक चोंदत असल्यास दोन-तीन थेंब पातळ केलेले साजूक तूप नाकात टाकणे चांगले. यामुळे सहसा लगेच नाक मोकळे होते व श्वा स घेणे सोपे होते.
नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सर्दीमुळे किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अवरोध तयार झाल्याने कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. यालाच सायनोसायटिस असे म्हटले जाते. यावर गरम पाण्याचा वाफारा घेणे, ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, रुईच्या गरम पानाने शेकणे यासारखे उपाय करता येतात. दालचिनी, लवंग, चंदन, केशर वगैरे द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप सायनसवर लावण्यानेही आराम मिळू शकतो.
घोळणा फुटला तर
नाकातून रक्तट येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्ती येणाऱ्या व्यक्तीध असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीअला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्या वर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात घेणे, बोलणे, श्वारसोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीणशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यंक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ सकाळ
Leave a Reply