आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष २०१४-१५ चे विवरणपत्र काही कारणास्तव दाखल करायचे राहून गेले असल्यास ३१ मार्च २०१७ ही अंतिम तारीख आहे, हे विसरता कामा नये.
आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या प्राप्तिकर विवरणपत्राबाबत.
सामान्यपणे आर्थिक वर्ष संपले, की ३१ जुलै ही त्या संपलेल्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करावयाची देय तारीख असते. परंतु, बऱ्याच करदात्यांकडून देय तारखेपर्यंत असे विवरणपत्र दाखल होत नाही. अशाच प्रकारे जर आपले आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र अजूनही सादर केले गेले नसल्यास ते ३१ मार्च २०१७ च्या आधी दाखल करावे, खरे तर ३१ मार्च २०१७ नंतरही आपण आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र दाखल करू शकता. परंतु, ३१ मार्च २०१७ नंतर आपणास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. या दोन्ही आर्थिक वर्षांच्या विवरणपत्राबाबत तुम्ही देय तारखेनंतर विवरणपत्र दाखल करत असल्यामुळे आपल्याला दुरुस्तीपत्र दाखल करता येणार नाही.
अॅडव्हान्स टॅक्स बद्दल.
खरे तर आगाऊ कर हा सुद्धा टप्याटप्याने भरला गेला पाहिजे. परंतु तो भरला नसल्यास आताही वेळ गेलेली नाही, कारण ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक वर्ष १६-१७ साठी भरला गेलेला प्राप्तिकर हा आगाऊ करच असतो. थोडक्याणत सांगायचे तर ज्यांचा देयकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त येत आहे, त्यांनाच आगाऊ कराच्या तरतुदी लागू आहेत. तसेच असे ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा जास्त) ज्यांना उद्योगधंदा अथवा व्यवसायातून काहीही उत्पन्न नसल्यास, त्यांनाही आगाऊ कर भरणे सक्तीचे नाही. अशांनी येणारा देय प्राप्तिकर आपले विवरणपत्र दाखल करण्याआधी भरला तरी चालू शकेल. नव्या नियमानुसार, जे व्यापारी एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के निव्वळ नफा दाखवून प्राप्तिकर कलम 44 ए.डी अंतर्गत विवरणपत्र दाखल करतात, अशांना देखील आता मार्च महिन्यातील आगाऊ कराचा हप्ता भरणे जरुरीचे केले आहे. आगाऊ कर न भरल्यास अथवा कमी भरल्यास व्याजरुपी ओझे करदात्याला सोसावे लागू शकते.
पगार सोडून इतर करपात्र उत्पन्न असल्यास (व्यवसाय, भाडे, मुदत ठेवींवरील व्याज, भांडवली नफा आदी) आणि असे उत्पन्न आपल्या कंपनीने घोषित केले नसल्यास त्यावर बसणाऱ्या कराची गणना करून आगाऊ कर भरला गेला पाहिजे. बॅंक आपळ्या व्याजातून करकपात करत असते, पण अशा करदात्यांनी लक्षात घ्यावे, की बॅंक ठेवींच्या व्याजातून केवळ १० टक्के दराने करकपात केली जाते. परंतु, जर तुमचे वार्षिक एकूण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख अथवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अनुक्रमे २० टक्के आणि ३० टक्के कर दरात येतो. तेव्हा केवळ १० टक्के करकपात पुरेशी नाही, हे लक्षात ठेवा.
प्राप्तिकर बचतीसाठीच्या गुंतवणुकीसारखी इतरही काही कामे आहेत, जी आपण ३१ मार्च २०१७ पूर्वी आवर्जून पूर्ण करायला हवीत.
एनपीएस
एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.
पीपीएफ अकाउंट
पीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.वर फक्त महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होणार नाही, हाच त्यामागचा उद्देश!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply