ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही…
आ गए तुम?
द्वार खुला है, अंदर आओ..!
पर तनिक ठहरो..
ड्योढी पर पड़े पायदान पर,
अपना अहं झाड़ आना..!
मधुमालती लिपटी है मुंडेर से,
अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..!
तुलसी के क्यारे में,
मन की चटकन चढ़ा आना..!
अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..!
जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..!
बाहर किलोलते बच्चों से,
थोड़ी शरारत माँग लाना..!
वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है..
तोड़ कर पहन आना..!
लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो..
तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..!
देखो, शाम बिछाई है मैंने,
सूरज क्षितिज पर बाँधा है,
लाली छिड़की है नभ पर..!
प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है,
घूँट घूँट पीना..!
सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!
…महाश्वेता देवी.
अनुवाद…
आलास..?
ये, दार उघडंच आहे …आत ये
पण क्षणभर थांब….
दारातील पायपुसण्यावर
अहंकार झटकून ये…
भिंतीला बिलगून वर चढलेल्या
मधुमालतीच्या वेलावर
नाराजी सोडून ये…
तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये…
बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये…
पायातल्या चपलांबरोबर
मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..
बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून
थोडा खेळकरपणा मागून आण..
गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू
चेहेऱ्याला लावून आण…
ये…
तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न
माझ्यावर सोपव…
तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला
प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते…
ही बघ….
तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी..
सूर्य क्षितिजाला बांधलाय
आणि
आकाशी गुलालाची उधळण केलीयं…
प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर
चहा उकळत ठेवलाय…
तो घोट घोट घे….
ऐक ना …
इतकंही अवघड नाहीये रे जगणं …
—
Beautiful ??