हळुवार घेत अंगडाई सावरत केशसंभार वळवून मान तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत अनोळखी राहत गालातल्या गालात तुझे गोड हसणे………… आवडते मला………… पाहताच मला चढणारे गोड पण कणखर स्वर साधताना संवाद मैत्रिणीशी तुझे उगाचच ते………….. आवडते मला ………… अबोल राहत हाव – भावाने मर्यादा पाळत संवाद साधने तुझे प्रेमाशी प्रेमाने………. आवडते मला ……. साधे राहत आपलेपणा जपत कोणासही न दुखावता सतत आनंदी राहत कशाचा तरी तुझे शोध घेणे ………… कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply