मग काय मोजायचे ना आता वाढीव पैसे इंधनासाठी ? सांगणार कोणाला म्हणा द्यावेच लागणार, पण असो
आज भाव वाढणार उद्या कमी (अपेक्षा ठेवूच नका) होणार त्याबद्दल काही वाद नाही.
पण नुसती खबर जरी या इंधनाविक्रेत्यांना लागली तर आदल्या दिवशीच इंधन शिल्लक नाही असा
फलक बघावयास मिळतो. इकडे इंधन दर वाढ आणि तिकडे इंधन शिल्लक नाही दोनी क्रिया अगदी बरोबर घडतात.
पण याबद्दल कोणीच बोलतांना दिसत नाही आणि का ?
बघा ना सरकारी अधिकारी सुद्धा याबद्दल दखल घेत्तांना दिसत नाही. दुकानासमोरून गाडी नेतो पण चौकशी करायचे कष्ट घेत नाही. प्रत्येक ठिकाणी हीच बोंब असते.
काय करायचं आणि कुणाला सांगायचं नेहमी प्रश्न पडतो कोण ऐकेल आमच कुणास ठाऊक.
पण जर दर कमी होणार असेल तर का संपत नाही इंधन त्यावेळी का नाही लागत फलक इंधन शिल्लक नाही म्हणून.
—
Leave a Reply