नवीन लेखन...

इच्छामणी गणपतीची इच्छापूर्ती

    

इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. नाशिकचे मंदिर बांधण्याआधी त्यांनी मध्यप्रदेशातील धार, महाराष्ट्रातील शिरपूर, नंदूरबार व धुळे येथे मंदिरे स्थापन केली. नाशिकचे मंदिर हे आठवे मंदिर.

आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून इच्छामणी गणपतीचा लौकीक आहे. या गणपतीला भाविकांची रोजच गर्दी असते. दर चतुर्थीला येथे भरणारी यात्रा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.

मंदिर पुर्वाभिमुख आहे. या मंदिरासमोर प्रशस्त असा सभामंडप आहे. मंदिरातील सुबक संगमरवरातील गणेशमूर्तीचे आकर्षण वेगळेच. या मूर्तीला चार हात असून ती राजस्थानावरून खास बनवून आणली होती. गणपतीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी व समोर काळ्या पाषाणातला सुबक मुषक आहे. मुळातच या मंदिरात स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येत असल्याने सभामंडपात ध्यान धारणा करण्यास प्रसन्नता वाटते. सभामंडपात किर्तनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. मंदिरात दरवर्षी पाडवा ते रामनवमी असा उत्सव साजरा करण्यात येतो. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, येथे येणारा प्रत्येक पैसा सामाजिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येतो. मंदिराच्या वतीने प्राथमिक विद्यालय चालवण्यात येत असून विश्वस्तांचा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत.

शाळेत शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षिणक सुविधा पुरवण्याकडे विश्वस्तांचा भर असतो. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची फी भरणे परवडणारे नसल्यास त्याच्या शैक्षिणक खर्चाचा वाटा मंदिराकडून उचलला जातो. प्रत्येक चतुर्थीला येथे रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. तसेच सर्वरोगनिदान शिबीर दर दोन ते तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येते. गरजूंना मोफत औषधेही देण्यात येतात. नेत्ररोग शिबीरही घेतले जाते. मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने हृदयरोग शस्त्रक्रियांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू झाली असून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचा विश्वास ट्रस्टींनी व्यक्त केला.

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..