वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन
घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण
चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची
स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची
परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो
फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो
कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें
भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें
असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित
समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply