तप्त सळई स्पर्ष करीतां , चटका देई शरीराला
सुप्त अशी औष्णिक शक्ति, आस्तित्व दाखवी त्या वेळेला
विजा चमकूनी गर्जती मेघ, लख्ख उजेड सारी काळोख
प्रकाश नि ध्वनीच्या लहरी, आस्तित्वाची दाखवी झलक
साधी असे तार तांब्याची, झटका देई विद्युत असतां
विद्युत शक्तीचा परिणाम, जाणवी देहा प्रवेश करतां
झाडावरले पडता फळ, भूमी घेई खेचुनी त्याला
गुरुत्वाकर्षन शक्ति ही, झलक दाखविते जगाला
ईश्वरा अस्तित्व भासे, अशाच शक्तिरुपानें
अद्दष्य असुनी परिणाम, दाखवी निसर्ग सुप्त गुणानें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply