रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे माझी व्यक्तीशः सर्वच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती पण नाही शक्य झाले.
ई-साहित्य संमेलन ऑनलाईन सारख्या संमेलनांची मराठी साहित्याची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. हे संमेलन आयोजित करणे हे खरं म्ह्णजे खूपच धाडसाच काम आहे ते धाडस आसावरीजी आणि आयोजक आनंदाने करतात म्ह्णून त्यांचे आभारच मानायला हवे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी साहित्याची चळवळ वाढावी म्हणून मोलाचा हातभार लागत आहे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन उपक्रमामुळे मला व्यक्तीशः माझा साहित्यिक दर्जा ठरविण्यासाठी मदतच होते कारण आपल्या साहित्यावरील नामवंत लेखक कवींनी केलेली समिक्षा आपल्याला वाचायला मिळते त्यसोबत आपल्या साहित्यातील त्रूटी ही आपल्या लक्षात येण्यास मदत होते.
प्रत्यक्ष कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहणे मला कधीच शक्य झाले नाही पण या साहित्य संमेलनामुळे अप्रत्यक्ष का होईना तीन साहित्य संमेलनाला माझी हजेरी लागली. बर्याचदा कवी आणि लेखकांना तेच ते प्रकाराचे साहित्य लिहून बर्याचदा कंटाळा आलेला असतो या साहित्य संमेलनामुळे नवीन काही तरी लिहण्यास साहित्यिकांना प्रेरणा मिळते निदान तसा प्रयत्न तरी करण्याची इच्छा निर्माण होते.
खरं म्ह्णजे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे व्यासपीठ नवोदित साहित्यिकांसाठी फारच महत्वाचे व्यासपीठ ठरायला हवे होते पण दुदैवाने ते तसे ठरताना दिसत नाही कारण या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन मध्ये सहभागी झालेले सारेच लेखक कवी बर्यापैकी नावाजलेलेच आहेत. या अशा साहित्य संमेलनातून नवोदितांचा सहभाग अपेक्षित असतो तो दिसला नाही याचा अर्थ या साहित्य संमेलनाची प्रसिद्धी कमी पडली असं म्ह्णता येईल पण त्यासाठी आयोजक नाहीत तर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायलाच हवे. आयोजकांनी हे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे आयोजन करून एक प्रकारे साहित्य सेवाच केलेली आहे. त्यामुळे सहभागी साहित्यिकांनी त्यांचे आभार मानायलाच हवेत पण यापुढेही हा उपक्रम सुरू राहावा म्ह्णून ज्याला जी मदत करणे शक्य आहे त्याने ती करायलाच हवी.
या संमेलनात फक्त आपला सहभाग नोंदवला म्ह्णजे आपली जबाबदारी संपत नाही तर ती उलट वाढते कारण मराठी साहित्यासाठी काही तरी करण्यासाठी आपण तेंव्हा एक पाऊल पुढे टाकलेले असते. आजच्या आघाडीच्या लेखकांना ही संगणकाचा वापर तितकासा सफाईदापणे करता येत नाही त्यामुळे ही बरेच साहित्यिक या उपक्रमात सहभागी होण्याचे ठाळत असावेत तर मला व्यक्तीशः असं वाटत की त्यांच साहित्य इतर कोणाच्याही मदतीने या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहविणे शक्य असायला हवं होतं.
या उपक्रमात साहभागी होणार्यांची संख्या वाढायला हवी होती खास करून वाचकांची पण ते होताना दिसत नाही. वाचकांपर्यत पोहचण्यासाठी या माध्यमातून एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यास बर्याच गोष्टी सोप्प्या होतील. ते शक्य होईल तेंव्हा होईल पण तोपर्यत हा ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे चा उपक्रम सुरू राहायलाच हवा…
— निलेश बामणे
Leave a Reply