कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक – उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ‘ ‘ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. ” भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की ” या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. ” सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply