कडक उन्हाने समुद्र तापला
पाण्याच्या वाफा वरती गरल्या
काळे काळे ढग आकाशी जमले
दंगा मस्ती करु लागले
धडाड धुम, कडाडकड
धोधो पाऊस कोसळू लागला
धरती प्राणी सुखावले
तृप्त सागर शांत झाला
सागराचे रुणवरुणाने फेडले
किसान सारे उद्योगाला लागले
धरणे, नद्यात पाणी साठवले
शेतांमध्ये धान्य पिकले
धरती, हवा, आकाश, पाणी
रविराजाला विसरु नका कुणी
उपकारकर्ते हे सारे
म्हणून सुखाने जगतोय आपण बरे
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply