एकदा तू पुन्हा पुकार मला
‘काय करतोस?’ हे विचार मला
बाळगू शस्त्र मी कशासाठी?
लाभले शब्द धारदार मला
राहतो मी इथे असाकाही
एक कोटी जणू पगार मला
जागलो मी तिला कसे कळले?
थोपटू लागली दुपार मला
प्रेम माझे अखंड देशावर…
वाटले मी न प्रांतवार मला
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply