2 सप्टेंबर 1878 या दिवशी एडवर्ड बराट या सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद. सामना होता प्रवासी कांगारूंविरुद्ध केनिंग्टन ओवलवर. बराट एका बाजूने गोलंदाजी करीत असताना दुसर्या बाजूने तिघांनी गोलंदाजी केली. चार्ल्स बॅनरमनच्या 51 आणि फ्रेड स्पोपोर्थच्या 14 वगळता कुणीही दोनांकी धावा करू शकले नाही. एवढे होऊनही सामना बराटच्या संघाने ‘तब्बल’ 8 धावांनी गमावला. दुसर्या डावात बराटला एकच बळी मिळाला. दोन्ही डावात स्पोपोर्थने बराटचा भोपळा फोडलेला नसतानाच त्रिफळा उडवला. ऑस्ट्रेलियन्स 77 आणि 89. प्लेयर्स 82 आणि 76.
2 सप्टेंबर 1980 रोजी लॉर्ड्सवर अनिर्णित अवस्थेत संपलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा किम ह्युजेस पाचही दिवस फलंदाजी करणारा इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला. लॉर्ड्सवरील ही शंभरावी कसोटी होती आणि आकाशातील देव तिला अधूनमधून जलधारांचा आशीर्वाद देत होता. पाहुण्यांचा पहिला डाव तिसर्या दिवशी संपला. या दिवशी ह्युजेस 117 धावांवर बाद झाला. इंग्लंडचा पहिला डाव चौथ्या दिवशी संपला. दिवसाखेर किम ह्युजेस 38 धावांवर खेळत होता. पाचव्या दिवशी तो 84 धावांवर बाद झाला. बीबीसीचा टेस्ट मॅच स्पेशल हा कार्यक्रम लोकप्रिय करविणार्या जॉन अर्लॉटची समालोचनाची कारकिर्दही या दिवशी संपुष्टात आली. अखेरच्या वेळी तो कार्यक्रमाच्या सादरीकरणास प्रारंभ करीत असताना मैदानावरील अनेक प्रेक्षक टाळ्या वाजवीत उभे राहिल्याने सामना काही काळ थांबवावा लागला.
…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply