नवीन लेखन...

एका चिमण्याची गोष्ट

(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य ….

वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला  त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच  झाली. क्षणभरातच  ते  जगाला विसरले.  एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले.  आकाशात विहरताना त्यांना  एक वडाचे झाड दिसले.  वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले. वडाच्या झाडाच्या एका फांदीवर त्यांनी एक घरटे बांधले.  अश्यारितीने चिमणा चिमणीचा  संसार सुरु झाला.

पण संसार काही पोरखेळ नव्हे. कित्येकदा वादळामुळे त्यांचे घरटे नष्ट झाले. चिवताईने दिलेली अंडी नष्ट झाली. तर कधी-कधी आकाशात उडणार्या ससाण्याची नजर त्यांच्या घरट्यावर पडली. डोळ्यांदेखत त्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल झाली. सर्व संकटांमध्ये एका-दुसर्याची साथ देत मोठ्या जिकरीने चिमणा संसाराची गाडी पुढे रेटू लागला. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. चिमण्याचे घरटे पिल्लांच्या चिव-चिवने गुंजायमान झाले. चिमणा दूर-दूर जाऊन पिल्लांसाठी जेवण घेऊन येत असे.  घरट्यात चिवताई हि  डोळ्यांत तेल घालून पिल्लांची देखरेख करीत असे.  पिल्लांच्या लालन-पालन करण्यात त्यांचा वेळ कसा गेला त्यांना हि कळले नाही. काळ पुढे सरकत गेला. त्यांची पिल्ले मोठी झाली. त्यांना पंख फुटले.  शेवटी त्यांच्या अथक कष्टाचे फळ त्यांना मिळाले, असे चिमण्याला वाटले.असेच एका वासंतिक दिवशी त्यांची पिल्ले  घरटे सोडून नेहमीसाठी  उडून गेली.  आता घरट्यात चिमणा आणि चिवताई दोघेच उरले.  संसाराच्या कडू आणि गोड त्यांच्या सोबत होत्या.  एक दिवस अचानक चिवताई हि चिमण्याला नेहमीसाठी सोडून गेली.

वडाचे झाड हि आता म्हातारे झाले होते. झाडाचा बुंधा हि वाळवींनी पोखरून टाकला होता. उरल्या होत्या फक्त काही वाळक्या फांद्या. सर्व पक्षी झाडाला सोडून निघून गेले होते.  फक्त चिमणाच त्या झाडावर उरला होता.  एक दिवस वडाचे झाड चिमण्याला म्हणाले, तू हि येथून निघून जा, माझा काही भरवसा नाही. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, आकाशात विजा चमकतात आहे.  या वयात  वादळ-वार्या समोर माझा टिकाव लागेल, काही सांगता येत नाही.  चिमणा म्हणाला,  याच झाडावर माझी पिल्ले लहानाची मोठी झाली. झाडाच्या फांदी-फांदीवर  संसाराच्या आठवणी दडलेल्या आहेत. चिवताईच्या सोबत घालविलेल्या सुखद आठवणी… कसा सोडून जाऊ मी तुला.

त्याच रात्री जोरात वादळ आले, मुसळधार पाऊस सुरु झाला. झाड उन्मळून खाली पडले.  त्या सोबत चिमणा हि  खाली पडला.  त्याने डोळे बंद केले. दूर आकाशात चिमण्याची चिवताई  त्याला बोलवीत होती. किती वाट पहिली तुझी…. चिमणा तिच्याकडे बघून हसला आणि त्याने डोळे बंद केले.  काही क्षणात दोघे पुन्हा एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. कधी न विलग होण्यासाठी…..

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

1 Comment on एका चिमण्याची गोष्ट

  1. नमस्कार.
    सुंदर ललित लेख. भावपूर्ण.
    – त्यातील आतला अर्थही , माझ्यासारख्या , ‘एक पाँव क़बर में लटकाए हुए’ , वयानें पुढे पुढे जात असलेल्या, life partner गमावलेल्या माणसाच्या हृदयाला अगदी भिडला.
    – लेखाबद्दल धन्यवाद. अधिक काय लिहूं ?
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष स. नाईक
    मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..