नवीन लेखन...

एका दलित अभ्यासकाचे जाहीर निरीक्षण

बाबा गाढे हे अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते आहेत. ब्राम्हण आणि सी. के. पी. समाजाविषयी त्यांनी केलेले हे जाहीर निरीक्षण

मला ब्राह्मण आणि सी. के. पी. बांधवांचे नेहमी कौतुक वाटते !!

– देशातील ब्राह्मण आणि सी. के. पी. समाज.

लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्रह्मण आणि सी. के. पी. मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले.

कोणतेही घोषित आरक्षण नसताना खुल्या संवर्गातील ९० % जागा त्यांनी आपल्या गुणवत्तेने काबीज केल्या आणि काही लोक त्यांच्याशी खुली स्पर्धा करण्यापेक्षा मागास वर्गावर कुढू लागले. पण आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मणांनी आणि सी. के. पीं नी आपले मोर्चे कधीच काढले नाही ना कधी आंदोलन केले.

त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण आणि सी. के. पी. माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत.

विशेष म्हणजे या देशात ब्राम्हणांना आणि सी. के. पीं ना इतके बडवले जात असतानाही आज देशाची कमांड त्यांच्याच हातात आहे. खरेच मला या समाजाच्या वाटचालीचे नेहमीच कौतुक वाटते.

— बाबा गाढे
अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..