नवीन लेखन...

एक नविन विचारधारा

जातीचं काय घेउन बसलात राव…
अरे जात म्हणजे काय
माहित तरी आहे का..?
अरे कपडे शिवणारा शिंपी,
तेल काढणारा तेली,
केस कापणारा न्हावी
लाकुड़ तोडणारा सुतार
दूध टाकणारा गवळी
गावोगावी भटकणारा बंजारा
वृक्ष लावणारा माळी
आणि लढाई लढणारा क्षत्रिय…

आलं का काही डोस्क्यात..?
आरं काम म्हणजे जात…
आता भांडत बसण्यापेक्षा
जाती बदला…
आता इंजीनीयर ही नवी जात…
कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात…
“सी. ए” ही पोटजात,
“एम. बी. ए” ही नवी जात…

बदला की राव…
कवाचं तेच धरुन बसलात…
घरीच दाढी करता नवं?
मग काय न्हावी का?
बुटाला पालीश करता नव्हं?
मग काय चांभार का?
गैलरी टेरेस वर झाडे लावता ना
मग माळी का?
दूध टाकणारा मुलगा गवळी का?

आरं बायकोच्या धाकानं का हुईना
संडास साफ करता नव्हं?
मग काय……..?
आता अजून बोलाया लावू नका
आरं जात न्हाई ती जात…..न?
बरं जात नाही तर बदला की मग…
आरं कोण मोठा कोण छोटा?
ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?
ह्यालाबी खायला लागतं
आणि त्याला काय फक्त….?

आरं कामानं मोठं व्हा,
जातीनं न्हाय…
आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,
हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?
मंग कशाला उगीचच?
सगळ्याला आता काम हाय…
सगळ्याला शिक्षाण हाय…
शिकायचं…
कामं करायची…
पोटं भरायची…
की हे नसते उद्योग करायचे..!

गिरीश लाड यांनी “जात”या विषयावर केलेले भाष्य…मनाला खुप भावले.

पहा तुम्हाला ही उमगते/आवडते का ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..