नवीन लेखन...

एक यशस्वी मित्र

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक रविवारी दुपारी ३.३० ते ४.३० सादर होणाऱ्या ‘दुसरी बाजू’ ह्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमात श्री. विक्रम गोखले त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारत असताना माझं मन आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलं आणि काही वर्षांपूर्वी लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली.

एक यशस्वी मित्र

३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी नाशिक विभागात काम करत असताना नाशिक शहराच्या जुन्या भागातील एका मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनातर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाट्य व चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्नं बाळगणारी अनेक तरुण मुलं-मुली महाराष्ट्राच्या विविध भागांमधून तिथे एकत्रित झाली होती. मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये माझ्या आईचाही समावेश असल्यामुळे व्यस्ततेतून थोडा वेळ मिळाला की मीही त्या शिबिरात प्रेक्षक या नात्याने सहभागी होत असे. एक दिवस माझ्या आईने एका सावळ्या, कुरळे केस असलेल्या व शिडशिडीत बांध्याच्या तरुणाची माझ्याशी ओळख करून दिली. ‘‘हा मुलगा आपल्या नागपूरचा आहे. खूप टॅलेंटेड आहे आणि एक दिवस नाट्यक्षेत्रात खूप नाव कमावेल.’’ त्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी नाट्य व सिने सृष्टीतील अनेक अनुभवी कलाकार येत असत व त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट तो तरुण अत्यंत काळजीपूर्वक आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असे.

नोकरीच्या निमित्ताने माझी देशात सर्वत्र भटकंती सुरु झाली आणि व्यस्ततेमुळे अनेक वर्षे आमची भेट झाली नाही. एक दिवस एका नाटकाच्या जाहिरातीत त्याचा चेहरा झळकला आणि माझ्या लक्षात आलं की नाट्यसृष्टीत त्याचा प्रवास सुरु झाला आहे. काही वर्षांनंतर एका मराठी मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या मुलाखतीत त्याचा फोन नं मिळाला आणि काही क्षणातच आमचे बोलणे झाले. तो नाशिकच्या नाट्यशिबिराच्या आठवणींमध्ये रंगून गेला. त्याने आवर्जून माझ्या आईची चौकशी केली आणि ती हे जग सोडून गेल्याचं कळल्यानंतर तो प्रचंड हळहळला. एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात त्याचं काम आवडलं की मी त्याला आवर्जून कळवणं व माझ्या एखाद्या लेखावर त्याने तत्परतेने प्रतिक्रिया व्यक्त करणं हे आम्हा दोघांमध्ये मित्रत्वाच्या भावनेतून अनेकदा घडू लागलं.

मित्रांनो, माझा हा मित्र आज मराठी नाट्य व सिनेसृष्टीतील एक अत्यंत यशस्वी व व्यस्त अभिनेता झाला आहे ज्याला आपण सर्व डॉ. गिरीश ओक या नावाने ओळखतो !

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..