अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते
पुढे . . . गेल्या ५ वर्षात केंद्रीय लोकसेवा परिक्षेत राज्यातून अनुक्रमे ५३, ६७, ७३, ८१ अशा चढत्या क्रमाने आणि यंदा तर तब्बल ९० उमेदवार उत्तीर्ण झाले. यु.पी.एस.सी.मधील मराठी टक्का वाढतो आहे. ही बाब मराठी मनाला . . . माणसाला . . . निश्चित समाधान देणारी आहे.या यशस्वी उमेदवारा पैकी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविणार्या स्वप्नील पाटीलची गोष्ट काही औरच आहे. तर शिवप्रसाद नकातेची परिस्थिती थोडी बरी म्हणता येईल. कधीकाळी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या छायेत असणार्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे अगदी छोटसं गाव . . . या गावातील ही दोन ध्येयवादी तरुण मुले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत स्वप्नील ३४५ व्या तर शिवप्रसाद हा ११९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या परिक्षेचा निकाल जाहीर होताच उपळाई बुद्रुक येथील नागरीकांच्या उत्साहाला आनंदाची भरती आली. कारण पुन्हा एकदा यु.पी.एस.सी. मध्ये या तरुणांनी गावचे नाव उज्ज्वल केले. यापूर्वी याच गावातून एक आय.ए.एस., एक डी.वाय.एस.पी., १६ फौजदार, ४० पोलीस आणि घरटी एक व्यक्ती सैन्यात . . . तर आता आणखीन दोन आय.ए.एस. अधिकार्यांची त्यामध्ये भर पडली. एकंदरीत या गावाने आतापर्यंत तीन आय.ए.एस. ऑफिसर दिले. गावाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहर्यावरुन समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता.गुरुवारी उपळाई बुद्रुक येथे सायंकाळी ५ वाजता या दोन शिले
ारांचे आगमन झाल्यावर गावातील तरुण, वृद्ध, लहान मुले एकत्र आली. या गुणवंतांना उघडय़ा जीप मध्ये बसविले. अन् गुलालाच्या मुक्त उधळणाला सुरुवात होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. . . जगज्जेत्याची मिरवणुक निघावी तशी ही राजेशाही मिवणुक हळूहळू उपळाई बुद्रुकच्या गल्लीबोळातून पुढेपुढे निघाली . . . घरंदाज महिला . . .मुली ठिकठिकाणी गच्चीवर उभ्या राहून या राजेशाही मिरवणुकीचा डौल डोळ्यात साठवत होत्या.. . काही माता आपल्या कडेवरील मुलाच्या कानात हळूच सांगत होत्या . . . माझ्या राजा ! उद्या तुलाही असेच भव्यदिव्य यश मिळवायचे आहे . . . गावचे नाव उज्ज्वल करावयाचे आहे.रात्री उशीरापर्यंत ही मिरवणुक चालली. मुख्य चौकात या दोघांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी या गावाला अक्षरश: जत्रेचे स्वरुप आले होते. माढा तालुक्यातील या छोटय़ाशा गावाने आतापर्यंत प्रशासकीय सेवेत अनेक अधिकारी दिले. . . यापुढेही हे गाव अधिकारी देत राहील . . . उपळाई ब्रुद्रुक या छोटय़ाशा गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घेतला तर . . ?
“महान्यूज”च्या सौजन्याने
— फारुक बागवान
Leave a Reply