नवीन लेखन...

एक विचार

‘दगड’

‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो.

अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.

हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.

स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो.

मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.

रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.

शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.

शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.

बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.

सतत आपल्या मदतीला धावून येतो, “देवा’सारखा.

मला सांगा, ” ‘देव’ सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ??”

बाई म्हणतात, “तू ‘दगड’ आहेस . तुला गणित येत नाही. आई म्हणते, “काही हरकत नाही, तू माझा लाडका ‘दगड’ आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता.”

आई म्हणते , “दगडाला शेंदुर फासून त्यात भाव ठेवला की, त्याचा ‘देव’ होतो.”

म्हणजे, ‘दगड’च ‘देव’ असतो.

Moral :-

“Be positive.
Every one is good.
But
It’s Position matters”

— वसंत चरमळ

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..