ज्वैलरचे बिल पाहून हार्टअटेक का येत नाही, असे मला नेहमीच वाटते. त्यानी माझ्याकड़े विचित्र नजरेने बघितले आणि विचारले, विवेक राव कवितेत ‘छंद’ कशाला म्हणतात, हे ही ठाऊक असेल तुम्हाला? “तसा मी छंदी-भंगी नाही! पण ‘छंद’ म्हणजे भंगचा एक प्रकार असावा. एकदा होळीत घेतली होती गोटी. आणि बायको समजून मेहुणीला मारली होती मीठी. नंतर काय जहाले हे तुम्हास न सांगणे योग्य”, मी हसत हसत म्हणालो. आता मात्र त्यानी आपले डोके अक्षरश: भिंतीवर आपटले आणि म्हणाले, विवेकराव आपले ज्ञान अगाध आहे.
— विवेक पटाईत
Leave a Reply