विदूषक म्हणून सर्कशीत प्रयोग करुन लोकांना हसायला लावणार्या एका व्यक्तीची कथा, एक होता विदूषक या १९९२ साली प्रदर्शित झालेल्या, चित्रपटात साकारली आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. पण लोकांना हसवणार्या या विदुषकाचं खासगी आयुष्य संपूर्णत: दु:ख आणि वेदनादायी असतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असून, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकीर्दीतला गंभीर सिनेमा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरच या चित्रपटात मधू कांबीकर, वर्षा उसगावकर, निळू फुले, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, तुषार दळवी या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
चला तर मग पाहूया हा चित्रपट..
—
Leave a Reply