साहित्य:
पाऊण वाटी ओट्स
चिमूटभर मोहरी
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
आवडीप्रमाणे १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१/२ चमचा काळा मसाला
मीठ चवीनुसार
पाव वाटी मटार
आवडीनुसार कडिपत्ता
१-२ चिमूट हळद
१ छोटा चमचा तेल
१ पेला पाणी
कृती:
ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला ठेवावेत. मग तेल तापवून त्यात, मोहरी कांदा, मिरची, कडिपत्ता चांगले परतून घ्यावे. हळद घालून आणखी परतावे. मग त्यात पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात काळा मसाला, मटार घालून उकळू द्यावे. मग यात ओट्स घालावेत. ओट्स घालताना सतत हलवत रहावे अन्यथा कढईला चिकटण्याची शक्यता असते. यावर झाकण ठेऊन शिजवावे. अधून मधून हलवत रहावे. पाणी पूर्ण आटून द्यावे. अशाप्रकारे ओट्सचा पौष्टिक उपमा तयार. आवडत असल्यास त्यात आपण शेंगदाणेही घालू शकतो. कोथिंबीर बारीक चिरुन त्यावर घालावी व उपमा सर्व्ह करावा.
Leave a Reply